खोट्या WhastApp वेबसाईटपासून सावधान..

तो वान्नाक्राय व्हायरस आल्यापासून खर्‍या खोट्या बातम्यांना नुसता ऊत आलाय. सध्या भर पडलीय रंग बदलू शकणार्‍या व्हॉटसऍप वेबसाईटची.  अगदी सीतेला हरिणाच्या नव्या चोळीचा मोह पडला, तिथं नवीन रंगांतल्या व्हॉटसऍपचा मोह पडलेल्या तुमची-आमची काय कथा? पण हो, हे  व्हॉटसऍप रंग बदलत नाही बरं..

एका रेडिट (Reddit)च्या युझरनं म्हटल्याप्रमाणं ही वेबसाईट आपल्याला स्पॅम इन्स्टॉल करणार्‍या वेबसाईटकडे घेऊन जाते. प्रत्यक्षात जेव्हा तुम्हांला ही खोटी लिंक मिळते, तेव्हा तिचा डोमेन-पत्त्ता दिसतो खर्‍याखुर्‍या वेबसाईटच्या पत्त्यासारखाच, पण ती खरंतर आहेत इंग्रजीसारखी दिसणारी क्रिलीक अक्षरं. त्यामुळं जरी समोर whatsapp.com/colors दिसत असलं तरी तो खरा पत्ता नाहीय, तुम्हांला त्या लिंकवरून दुसरीकडेच पाठवलं जातं.

ही वेबसाईट पाठवते तुम्हांला एका ब्लॅकव्हॉट्स नावाच्या क्रोम एक्सटेन्शनच्या पेजवर. हे एक्सटेन्शन तुमच्या फोनवर डाऊनलोड होतं आणि  तुम्ही एखादं यंत्र किंवा कॉम्युटर नाही हे सिद्ध करण्यासाठी तुम्हांला ही लिंक तुमच्या फोनमधल्या इतरांना पाठवायला लावतं. इतकं झाल्यानंतर हे वेगवेगळे रंग फोनसाठी नाही, तर फक्त व्हॉटसऍप वेब म्हणजे डेस्कटॉपसाठीच आहे हे सांगण्यात येतं. हे ब्लॅकव्हॉट्स एक्सटेन्शन आहे खरं तर एक ऍडवेअर. म्हणजे ते सतत तुमच्या फोनवर किंवा टॅबवर सतत जाहिराती दाखवत राहील.

एखादं ऍप डाऊनलोड करताना आपण ते आपल्या आधी किती लोकांनी डाऊनलोड केलंय, त्यांचे काय रिव्ह्यूज आहेत, हे वाचतो. इथं हे ऍप आपल्याआधी १६,०००+ लोकांनी डाऊनलोड केलेलं दिसल्यावर लोकांना थोडी विश्वासार्हता वाटते. पण हो, इथं लिहिलेले रिव्ह्यूज मात्र तीनच आहेत.

सध्यातरी गुगल क्रोममधून हे एक्सटेन्शन काढून टाकण्यात आलंय. पण हे चोर असं करण्यासाठी दुसरे मार्ग शोधणार नाहीत असं नाही. तेव्हा थोडे सजग राहा आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required