व्हॉट्सऍपवर ब्ल्यू टिक बंद केली आहेत?? आता या ट्रिकमुळे लोकांना तरीही कळेल तुम्ही मेसेज वाचला की नाही...

आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी क्रांती आणणारा शोध  म्हणजेच व्हॉट्सऍप. सकाळी सुरू होणाऱ्या गुड मॉर्निंग मेसेजेसपासून  रात्रीबेरात्री येणाऱ्या असंख्य फॉरवर्ड्सना तुम्ही कंटाळला आहात. जवळच्या आणि लांबच्या खूप नातेवाईकांना  ब्लॉक करायची तुम्हाला खूप इच्छा आहे, पण सोशल प्रेशरमुळे  तुम्ही तेही करू शकत नाही. मग तुम्ही आधी 'लास्ट सीन ऍट' बंद करता. त्यानंतर मात्र तुम्ही एखादा मेसेज वाचला की नाही हे न कळण्याचा  व्हॉट्सऍपने तुम्हाला दिलेला ब्लु टिक बंद करण्याचा ऑप्शन हा तुमचा एकमेव सहारा होता. पण तुमची साडेसाती अजून संपली नाहीय राव. त्या बंद केलेल्या ब्ल्यू टिकवरही एक ट्रिक निघाली आहे.

तर असं आहे मंडळी, समजा तुम्ही ब्लु टिक बंद केली आहे, तर एखाद्या व्यक्ती सोबतच्या चॅटमध्ये त्याला तुम्ही मेसेज वाचला की नाही ते कळणार नाहीच. पण आता समजा,  ती व्यक्ती तुम्हाला एक व्हाईस मेसेज पाठवते, तुम्ही तो ऐकता आणि समोरच्या व्यक्तीला या मेसेजवर ब्ल्यू टिक दिसायला लागतात ना भाऊ!!!
त्यासाठी हा व्हॉइस मेसेज एक सेकंदाचा असला तरी चालणार आहे हो. व्हॉट्सऍपच्या एफ ए क्यू (FAQ) नुसार हे म्हणे एक फिचर आहे.

तर मग आता काय करायचं??? तुमच्या प्रायव्हसीची वाट लागली ना राव. आम्ही यावर थोडे रडून घेतो.  तोवर तुम्ही ही ट्रिक वापरून एखादी स्पेशल व्यक्ती तुमचे मेसेज वाचते का नाही ते बघून घ्या.