computer

‘तेंडूलकर ४८’ : सचिन बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ??

आज आपल्या सचिनचा वाढदिवस. सचिन बद्दल आम्ही काय लिहिणार. अनेकांनी त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. क्रिकेट रसिकांसाठी तो देव आहे, देशासाठी अभिमान, क्रिकेटर्ससाठी एक आदर्श खेळाडू. सचिन तेंडूलकर हे खूप मोठं नाव असलं तरी त्याचा फक्त ‘सचिन’ म्हणून उल्लेख करावा एवढा तो जवळचा वाटतो. या आपल्या सचिन बद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण सचिन बद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नसतात. आज अशाच काही माहित नसलेल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहोत.

आज सचिनच्या ४८ व्या वाढदिवशी आपण बघुयात सचिनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी.

१. १९८७ चा वर्ल्डकप.

१९८७च्या वर्ल्डकप दरम्यान सचिनने ‘बॉल बॉय’ (बाउन्ड्री बाहेर गेलेल्या बॉलला पुन्हा मैदानात फेकण्याचं काम) म्हणून काम केलं होतं. त्यावेळी तो अवघा १४ वर्षांचा होता. 

२. असं म्हणतात की सचिन त्याच्या सुरुवातीच्या काळात चक्क क्रिकेटचे साहित्य घेऊन झोपायचा. याला म्हणतात डेडिकेशन.

३. सचिन हा पहिला क्रिकेटर आहे ज्याला थर्ड अम्पायरकडून आऊट मिळाला होता.

यावरचा आमचा लेख येथे वाचा.

४. काउंटी चॅम्पियनशीप मध्ये खेळणारा सचिन हा सर्वात तरुण क्रिकेटर होता.

५. इतर खेळांसाठी प्रेरणास्थान

सचिन तेंडूलकर फक्त क्रिकेट प्रेमींसाठी किंवा क्रिकेटर्ससाठी प्रेरणास्थान नसून इतर खेळांसाठी सुद्धा तो रोल मॉडेल ठरला आहे. टेनिसपटू ‘बोरिस बेकर’ व फुटबॉलपटू ‘डियागो माराडोना’ यांनी सचिनला आपला आदर्श असल्याचं सांगितलं आहे.

६. सचिन आणि सौरव गांगुली

सचिन सौरव गांगुलीला ‘बाबू मोशाय’ म्हणतो तर सौरव गांगुली सचिनला ‘छोटा बाबू म्हणतो. 

७. तुम्हाला माहित नसेल पण सचिनला घड्याळ आणि परफ्युम्स कलेक्ट करायला आवडतं.

८. सचिन तेंडूलकरने त्याच्या पहिल्या टेस्ट मॅट्चमध्ये सुनील गावस्करने गिफ्ट केलेले पॅड वापरले होते.

९. सचिनने त्याच्या करीयरच्या सुरुवातीला रणजी, ड्युलीप, इराणी ट्रॉफी ची सुरुवात शतकांनी केली होती. त्याची चमक सुरुवातीलाच दिसली.

१०. सचिनने चित्रपट बघायला वेषांतर केलं होतं ?

सचिन तेंडूलकर १९९५ साली ‘रोझा’ चित्रपट पाहायला गेला होता. लोकांनी ओळखू नये म्हणून त्याने आपला वेश बदलला. काळा चष्मा, दाढी, मिश्या असा त्याने अवतार केला होता.. पण ऐनवेळी त्याचा चष्मा खाली पडला आणि लोकांनी त्याला ओळखलं.

मंडळी आपल्या या मास्टरब्लास्टरला बोभाटा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आणखी वाचा :

...जेव्हा क्रिकेटचा देव 'गली क्रिकेट' खेळतो....पाहा हा व्हायरल व्हिडीओ !!

क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अंपायरचा पहिला बळी कोण होता? उत्तर तुम्हाला माहित असायलाच हवं...

हा आहे सचिनच्या बॅटचा डॉक्टर : भेटा राम भंडारी यांना...

सबस्क्राईब करा

* indicates required