या ५ कारणांमुळे आर अश्विन आहे भारतीय संघाच्या वाईस कॅप्टनसीसाठी परफेक्ट चॉईस...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवत २-० ची आघाडी घेतली आहे. तर उर्वरित २ कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात कुठलाही बदल केला गेला नाहीये. मात्र केएल राहुलला उपकर्णधार पदावरून काढलं गेलं आहे. आता भारतीय संघाचा पुढील उपकर्णधारपद कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना, आम्ही तुम्हाला आर अश्विनला हे पद का दिलं गेलं पाहिजे याची ५ कारणे सांगणार आहोत.

केएल राहुलला काढून टाकण्यात आलं आहे

अखेर बीसीसीआयने केएल राहुलच्या फ्लॉप कामगिरीची दखल घेतली आहे. त्याला उपकर्णधारपदावरून काढून टाकलं आहे. ज्या ज्या ठिकाणी केएल राहुल या पदासाठी योग्य नसल्याचे दिसून आले. त्याच ठिकाणी आर अश्विन एकदम फिट बसतो. त्यामुळे आता त्याला संघाचे उपकर्णधारपद दिले जाऊ शकते.

खेळाडू म्हणून उत्तम रेकॉर्ड:

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, गोलंदाजाला सहसा कर्णधार उपकर्णधारपद दिलं जात नाही. नेहमी फलंदाजांवर विश्वास दाखवला जातो. असं असेल तर आर अश्विनवरही विश्वास दाखवला जाऊ शकतो. कारण तो अनेकदा भारतीय संघ संकटात असताना फलंदाजीला येऊन भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढत असतो. तसेच गोलंदाजी करताना त्याने किती रेकॉर्डस् केले आहेत, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याने भारतीय संघासाठी ३००० पेक्षा अधिक धावा आणि गोलंदाजी करताना ४०० गडी बाद केले आहेत. हा विक्रम केवळ कपिल देव यांना करता आला होता.

कसोटी संघात फिक्स:

डॉन ब्रॅडमन यांनी पॉलिसी होती की, ११ योग्य खेळाडूंचा संघ निवडायचा. त्यानंतर कर्णधार आणि उपकर्णधाराची निवड करायची. या पॉलिसीनुसार आर अश्विन देखील उपकर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला तर त्यात आर अश्विनचं नाव नसेल असं होऊच शकत नाही

चूक सुधारण्याची संधी :

विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली होती. तर उपकर्णधार पदासाठी जसप्रीत बुमराहची निवड केली गेली होती. मात्र तो दुखापतीमुळे बाहेरी झाल्यानंतर, चेतेश्वर पुजारा आणि मग शेवटी केएल राहुलला ही जबाबदारी दिली गेली. त्यावेळी देखील अश्विनचा विचार केला गेला होता. मात्र त्याला संधी मिळाली नाही. आता बीसीसीआयकडे आपली चूक सुधारण्याची संधी आहे. 

उत्तम क्रिकेट माईंड:

कुठल्या परिस्थितीत काय करावं हे अश्विनला चांगलच माहीत आहे. त्याचं क्रिकेट माईंड खूप शार्प आहे. तसेच आक्रमक क्रिकेट कसं खेळावं याची देखील त्याला उत्तम जान आहे. 

आर अश्विन या पदासाठी योग्य ठरेल का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required