computer

का आहे हाईक मेसेंजर व्हाट्सअॅप पेक्षाही वरचढ? : वाचा हाईक वर मिळणाऱ्या या १० अनोख्या फीचर्स बद्दल

 

मंडळी, आजकाल व्हाट्सअॅप न वापरणारा माणूस शोधणं तसं लै अवघड होऊन बसलंय! अगदी लहान-थोर, गरिब-श्रीमंत, स्त्री-पुरूष असा कोणताही भेद न ठेवता जगातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये या व्हाट्सअॅपनं आपली हक्काची जागा मिळवलीये. अॅप मार्केटमध्ये या व्हाट्सअॅपला पर्याय म्हणून 'वायबर', 'लाईन', 'वुईचाट' असे अनेक इन्स्टंट मेसेंजर अॅप्स उपलब्ध असतानाही व्हाट्सअॅप लोकप्रियतेच्या बाबतीत या सर्वांच्या खूपच पुढं आहे. आज रोजी प्ले स्टोअरवरून जवळपास १०० कोटींपेक्षा अधिक वेळा व्हाट्सअॅप डाऊनलोड केलं गेलंय!

असं असलं तरी भारतात या व्हाट्सअॅपला आव्हान मिळतंय ते आपल्या स्वदेशी' 'हाईक मेसेंजर' अॅपचं. आतापर्यंत ५ कोटींपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड केल्या गेलेल्या हाईक मेसेंजरची लोकप्रियता त्यात मिळणाऱ्या अनोख्या फीचर्समुळे दिवसेंदिवस वाढताना दिसतीये. हाईक मेसेंजरमध्ये असं काय आहे बुवा जे व्हाट्सअॅप किंवा इतर इन्स्टंट मेसेंजरमध्ये नाही? चला एक नजर टाकूया.. 

अॉफलाईन चॅट


'अॉफलाईन चॅट' हे हाईक मध्ये मिळणारं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण फिचर आहे मंडळी. अॉफलाईन चॅटच्या मदतीने तुम्ही अॉफलाईन असणार्‍या व्यक्तीलाही आपला संदेश पोहचवू शकता. आपला संदेश त्या व्यक्तीला SMS च्या स्वरूपात मिळतो आणि हे SMS हाईक वरून मोफत पाठवले जातात. म्हणजेच एखाद्याचा डेटा पॅक संपलेला असेल तरीही आपण त्याच्याशी अॉफलाईन चॅटच्या माध्यमातून संपर्कात राहू शकतो! विशेष म्हणजे इथून तुम्ही हाईक न वापरणाऱ्या व्यक्तीलाही मोफत SMS पाठवू शकता.

स्टिकर्स

हाईकच्या लोकप्रियतेत वाढ होण्यामागे सर्वात मोठा वाटा आहे तो हाईक वर मिळणाऱ्या या भन्नाट स्टिकर्सचा! व्हाट्सअॅपवर तुम्हाला फक्त इमोजी मिळतील, पण हाईकवर इमोजीसोबतच वेगवेगळ्या व्हरायटीजचे आणि मराठी सारख्या स्थानिक भाषेतीलही शेकडो आकर्षक स्टिकर्स दिले गेलेत. यामुळे तुमच्या गप्पांची मजा आणखीन वाढेल.  इथे टाईपिंग सोबतच आपोआप स्टिकर्स सजेशन मिळत असल्याने हवं ते स्टिकर शोधत बसण्याची गरजही नाही!

हिडन मोड

हाईकवर मिळणाऱ्या 'हिडन मोड' फिचरमुळे तुम्ही तुमचे प्रायव्हेट कन्व्हर्सेशन्स लपवू शकता. इथे तुम्हाला पासवर्ड किंवा पॅटर्न लॉकची सुविधा मिळेल, ज्यामुळे तुमच्या सिक्रेट गप्पा कोणालाही वाचता येणार नाहीत.

कस्टम प्रायव्हसी

हाईकवर तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्रपणे प्रायव्हसी सेट करू शकता. म्हणजेच तुमचा लास्ट सिन, प्रोफाईल फोटो, स्टोरीज हे सगळं कोणी पहावं, आणि कोणी पाहू नये हे निवडण्याचा पर्याय इथे तुम्हाला प्रत्येक कन्व्हर्सेशनमध्ये उपलब्ध करून दिला गेलाय.

टू वे वॉलपेपर आणि थीम्स

हाईकवर तुम्ही प्रत्येक कन्व्हर्सेशनसाठी वेगवेगळे वॉलपेपर्स ठेवू शकता. तुम्ही सेट केलेलं वॉलपेपर हे पलीकडील व्यक्तीच्या कन्व्हर्सेशन स्क्रिनवरही सेट होतं. यालाच टू वे वॉलपेपर म्हणतात. यासोबतच हाईकवर वेगवेगळ्या थीम्सही मिळतील. इथे तुम्हाला हवा तसा इंटरफेस तुम्ही बदलू शकता.

फाईल शेअरींग मर्यादा

हाईकवरून तुम्ही PDF, APK, PPT, ZIP अशा सर्व फॉरमॅटमधील फाईल्स शेअर करू शकता आणि तेही १०० MB साईझपर्यंत! इतकी मोठी अटॅचमेंट साईझ लिमीट तर तुम्हाला इमेलमध्ये पण मिळणार नाही!

जास्त वेगवान

व्हाट्सअॅपच्या तुलनेत हाईकवर मेसेज डिलिव्हर होण्याचा वेग जास्त आहे. सोबत तुम्हाला मेसेज कधी पाठवला गेला, कधी वाचला गेला, याची तंतोतंत वेळही चेक करता येते.

वॉलेट आणि रिवॉर्ड सुविधा

नुकतीच हाईकने वॉलेट सुविधा सुरू केलीये मंडळी. ज्यामुळे तुम्ही आपल्या हाईक वॉलेटवरून रिचार्ज, बस तिकीट बुकींग, तसंच मित्रांच्या वॉलेटवरही पैसे पाठवू /मागवू शकता. त्याचबरोबर तुम्ही इन्व्हाईट केलेली लिंक वापरून जर कोणी हाईक जॉईन केलं तर तुमच्या हाईक वॉलेटवर तुम्हाला क्रेडीटही मिळेल!

अधिक सुरक्षित

जर तुम्ही सुरक्षीततेचा विचार करत असाल तर इथेही हाईक सरस ठरतं. व्हाट्सअॅपचे सर्व लॉग्स अॅन्ड्रॉईड मेमरीमध्ये स्टोअर होत असल्यामुळे ते एनक्रिप्टेड असूनही सुरक्षीत नसतात. याउलट हाईकमध्ये १२८ बीट एनक्रिप्शनची सिक्युरिटी दिल्यामुळे इथे तुम्हाला अधिक सुरक्षितता मिळते.

या सगळ्या सुविधाही एकाच ठीकाणी!!

या सगळ्या फीचर्स बरोबरच हाईक वर तुम्हाला लाईव्ह क्रीकेट स्कोअर, बातम्या, राशिभविष्य, विनोद, वेगवेगळ्या गेम्स, असं भरपूर काही एकाच ठिकाणी मिळेल! त्याचबरोबर टाईमपास म्हणून गप्पा मारायला इथे नताशा नावाची चॅट बॉटही आहे!

पाहिलंत ना राव? हे सारे फीचर्स तुम्हाला व्हाट्सअॅपवर मिळणार नाहीत. आणि त्यातही इतकं अ‍ॅडव्हान्स असलेलं हाईक मेसेंजर स्वदेशी असल्यामुळे तुम्ही ते जरूर वापरून बघा. मग, कधी करताय इन्स्टॉल

सबस्क्राईब करा

* indicates required