व्हॉटसअँप अपडेट : व्हॉट्सअॅप अॅडमिन, सावधान !! आता ग्रुपमेंबर तुम्हांला ग्रुपमधून हाकलू शकतात !!

मंडळी आज आम्ही जी बातमी देणार आहोत ती बातमी ऐकून व्हॉट्सअॅपचे समस्त अॅडमिन लोक कोमात जाण्याची शक्यता आहे. म्हणून आधीच सांगतो, जपून वाचा !!

तर, विषय असा आहे की व्हॉट्सअॅपने नवीन फिचर तयार केलं आहे. हे फिचर समस्त अॅडमिन लोकांच्या हक्कावर गडांतर आणू शकतं. या फिचरमुळे ग्रुप मधले लोक ग्रुप अॅडमिनला अॅडमिन पदावरून बडतर्फ करू शकतात आणि त्याचबरोबर ग्रुप मधून हकलू शकतात. म्हणजे व्हॉट्सअॅपवर खऱ्या अर्थाने लोकशाही आली आहे भौ...

पूर्वी कसं होतं, फक्त अॅडमिन अॅडमिनला ग्रुप मधून बाहेर काढू शकत होता. पण आता नवीन फिचरमुळे ग्रुप मधल्या साधारण पब्लिकला सुद्धा हा हक्क मिळणार आहे. हाकलण्यात आलेल्या अॅडमिनला परत ग्रुप मध्ये अॅड करता येऊ शकतं.

अॅडमिनला हाकलायचं कसं ?

अॅडमिन भाऊला ग्रुप मधून काढण्यासाठी किंवा अॅडमिन पदावरून खाली खेचण्यासाठी पुढील प्रक्रिया असेल.

स्रोत

१. ‘ग्रुप इन्फो’ वर क्लिक करा.

२. अॅडमिनला शोधून काढा.

३. अॅडमिनच्या नावावर क्लिक करा.

४. तुमच्या समोर लागोपाठ २ नवीन फिचर दिसतील.

१. Dismiss As Admin २. Remove From Group.

५. तुमच्या चॉईस प्रमाणे ऑप्शन निवडा.

 

सध्या हे फिचर फक्त आयफोन आणि वेबवर उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीप्रमाणे पुढील काळात ‘अॅन्ड्रॉइड’ मध्ये देखील हे फिचर उपलब्ध असेल. तुम्ही जर अॅडमिन आहात आणि एकेदिवशी स्वतःला अचानक ग्रुप मधून बाहेर पडलेलं बघितलं तर आश्चर्य मानू नका. बरं का !!

.....म्हणून अॅडमिन लोकहो ग्रुप मधल्या लोकांशी गुण्यागोविंद्याने राहा, नाय तर स्वतःच्याच ग्रुप मधून धक्के मारून हाकलण्यात येईल.

 

आणखी वाचा : 

आता व्हॉट्सअॅपवरच्या डिलीट केलेल्या फाईल्सही पुन्हा मिळवा...

व्हॉट्सऍपवर ब्ल्यू टिक बंद केली आहेत?? आता या ट्रिकमुळे लोकांना तरीही कळेल तुम्ही मेसेज वाचला की नाही...

का आहे हाईक मेसेंजर व्हाट्सअॅप पेक्षाही वरचढ? : वाचा हाईक वर मिळणाऱ्या या १० अनोख्या फीचर्स बद्दल...

खोट्या WhastApp वेबसाईटपासून सावधान...

सबस्क्राईब करा

* indicates required