computer

गुगलने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ६ नविन फिचर्स आणले आहेत...तुमच्या कामाचं कोणतं आहे??

तंत्रज्ञान जगतात रोजच्या रोज नवनविन अपडेट येत असतात. त्यातले महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. गुगलने नुकतेच आपल्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नविन फिचर्स आणले आहेत. या फिचर्सचा मुख्य भर हा सुरक्षितता असेल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे. हे खरे आहे का? इतर कोणकोणते फीचर्स आहेत?

चला तर या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया!!

१. गुगल मेसेज ॲपसाठी एन्ड टू एन्ड इनक्रिप्शन 

गुगलने त्यांच्या मेसेज सेवेसाठी आता एन्ड टू एन्ड इनक्रिप्शन फिचर आणले आहे. हे फिचर यापूर्वी व्हॉट्सॲप आणि इतर मेसेजिंग ॲप्सनी आणलं आहे. हे फिचर मेसेजिंग सुरक्षित ठेवण्यासाठी कामी येते. गुगल मेसेजिंगवर जेव्हा एखादा मेसेज इनक्रिप्ट होईल तेव्हा वापरकर्त्याला सेंड बटनजवळ एक लॉक दिसेल. हे फिचर ग्रुप्ससाठी अजून उपलब्ध नाही, तसेच sms/mms साठी पण उपलब्ध नाही. वन टू वन चॅटमध्ये हे फिचर उपलब्ध आहे. 

भूकंप अलर्ट सिस्टीम

हे फिचर २०२० च्या सुरुवातीला आणण्यात आले होते. ह्या फिचरद्वारे भूकंपाच्या परिस्थितीत काही वेळआधी मोबाईलवर अलर्ट देण्यात येते. तुर्कस्तान, कझाकस्तान, फिलीपाईन्स अशा देशांमध्ये हे फिचर उपलब्ध करण्यात आले आहे. हळूहळू इतरही देशांत ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

३. गुगल मेसेज ऍपवर मेसेज स्टार करता येणार आहे.

व्हॉट्सॲपवर ज्याप्रमाणे महत्त्वाच्या मेसेजला स्टार करता येते त्याचप्रमाणे गुगल मेसेजवर महत्त्वाच मेसेज स्टार करता येणार आहे. मेसेज टॅप करून ठेऊन ते सेव्ह करून ठेवता येऊ शकतात. गुगलने येत्या काही आठवड्यात हे फिचर सर्वांना उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे. 

४. गुगल किबोर्डवर इमोजी

गुगलच्या किबोर्डवर तुम्ही जसे मेसेज टाईप करणार त्या पद्धतीने तुम्हाला इमोजी सुचवले जातील. यामुळे इमोजी शोधण्याची मेहनत वाचणार आहे. अँड्रॉइड 6.0 आणि त्यापुढील व्हर्जन्स वापरणाऱ्यांना हे फिचर उपलब्ध असणार आहे. सध्या इंग्लिश, स्पॅनिश, पोर्तुगीज या किबोर्डसाठी हे फिचर उपलब्ध आहे.

५. व्हॉइस फिचर वापरून ॲप्स उघडणे.

तुम्ही आता गुगलला तुमचे आवडते ॲप सुरू करण्यासाठी व्हॉइस फिचरचा वापर करू शकता. तुम्ही व्हॉइस फिचरवर ज्या पद्धतीने गुगलला सांगणार त्या पद्धतीने ॲप तुमच्यापुढे उघडत जाणार आहे. 

६. अँड्रॉइड ऑटो नविन फिचर

अँड्रॉइड ऑटो वापरकर्ते आता त्यांची लाँचर स्क्रीन डायरेक्ट फोन मधून पर्सनालाईज करू शकतात. त्याचप्रमाणे इव्ही चार्जिंग, पार्किंग आणि नेव्हिगेशन ऍप्स आता अँड्रॉइड ऑटोवर वापरता येणार आहेत.

 

यातलं कोणतं फिचर तुम्हाला जास्त उपयोगी पडेल?

सबस्क्राईब करा

* indicates required