computer

गुगलने या २५ ऍप्सवर डेटाचोरीमुळे बंदी घातलीय. तुम्ही यातली कोणती ऍप्स वापरता?

देशात ५९ चायनीज ऍप्स बंद करण्यात आली. त्याचे कारण सायबर सिक्युरिटी हे होते. याच कारणामुळे गुगलनेसुद्धा २५ ऍप्स बंद केली आहेत. ही ऍप्स तर थेट फेसबुक लॉगिनची माहिती चोरी करत होते असा आरोप आहे. एविना नावाच्या एका सायबरफर्मने गुगलला यासंबंधी माहिती देऊन सांगितले की या ऍप्सच्या माध्यमातून मालवेअर फोनमध्ये शिरते आणि ते फेसबुक लॉग इन डिटेल्स चोरते. या एप्समध्ये फाईल मॅनेजर, फ्लॅशलाईट, वॉलपेपर, स्क्रीनशॉट, हवामान अशा सेवा देणाऱ्या ऍप्सचाही समावेश आहे. हे ऍप्स मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड झाले आहेत. गुगलने ही ऍप्स लागलीच डिलीट केली आहेत. तसेच या ऍप्सच्या वापरकर्त्यांनासुद्धा अनइन्स्टॉल करण्याची सूचना दिली आहे.

ही त्या बॅन झालेल्या ऍप्सची यादी-

1) wallpaper level

2) super wallpaper flashlight

3) padenatef

4) contour level wallpaper

5) iPlayer and iWallpaper

6) video maker

7) colour wallpaper

8) pedometer

9) powerful flashlight

10) super bright flashlight

11) super flashlight

12) solitaire

13) accurate scanning with qr code

14) classic card game

15) junk file clining

16) synthetic z

17) file manager

18) composite z

19) screenshot capture

20) daily horoscope wallpaper

21) wuxia reader

22) plus weather

23) ihealth step counter

24) com.tyapp.fiction

25) Anime Live Wallpaper

कोणतेही ऍप इन्स्टॉल करताना ते विनाकारण काही परमिशन्स मागत असेल - उदा. स्टोरेज, माईक, कॉन्टॅक्टस, कॉल हिस्टरी किंवा असंच काही जे त्या ऍपशी निगडित नसेल-तर ते ऍप वापरू नका. ताबडतोब अनइन्स्टॉल करा. एखादं काम नाही झालं किंवा उशिराने झालं तरी हरकत नाही, पण दुर्लक्ष केल्याने अक्कल विकत मिळाली असं व्हायला नको.

तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर तुम्ही आजवर कोणत्या ऍपला कोणत्या परमिशन्स दिल्या आहेत हे तुम्हांला इथे कळेल.

लक्षात ठेवा, 'जरासी सावधानी.....'!!!

सबस्क्राईब करा

* indicates required