computer

गुगल असिस्टंटला मराठीत प्रपोज करुन पाहा ती तुम्हांला काय उत्तर देते...

आज आम्ही तुम्हांला टाईमपास करण्यासाठी एक मस्त गंमतीशीर खेळ सांगणार आहोत. त्यासाठी तुमच्याकडे फक्त एक अँड्रॉईडवाला फोन असायला हवा. तो काय, तुमच्याकडे आहेच. सर्वात आधी सेटिंगमध्ये जा. तिथं Language and Input असेल. त्यावर क्लिक करुन Language या ऑप्शनमध्ये जा आणि 'मराठी' भाषा ॲड करा. आता तुम्हांला लिस्टमध्ये English आणि मराठी या दोन भाषा दिसतील. मराठीवर बोट दाबून धरा आणि तो शब्द वरती ढकलायचा प्रयत्न करा. आताही तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा असतील, पण प्राधान्य मराठीला दिलं जाईल. 

आता ते सगळं बंद करुन बाहेर म्हणजे होमस्क्रीनला या. आपल्या मोबाईलचं मधलं बटन दाबून धरा. हे केलं, की आपल्यासमोर  गुगल असिस्टंट ओपन होईल. आता या गुगल असिस्टंटशी मराठीत गप्पा मारा आणि ती काय उत्तरं देते पाहा. 

तिच्यासोबत काय बोलाल ?

खरंतर असिस्टंट म्हटलं की फक्त मुलगीच असावी असं काही नाहीय. पण या गुगल असिस्टंटला मुलगीचा आवाज दिलाय म्हणून ती. तिला तुम्ही गुगल सर्च करायला सांगू शकता, फोन लाव म्हणून ऑर्डर देऊ शकता, गुणाकार-भागाकाराची गणितं घालू शकता आणि तारीख-वेळ-हवा याच्याबद्दलही विचारु शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तिच्याशी काहीही गप्पा मारु शकता आणि ती मस्त मराठीत उत्तरं देते. 

तशी ती कामाच्या बाबतीत बरेचदा चुकते, म्हणजे त्याबाबतीत बऱ्यापैकी कुचकामाची आहे असं म्हणू शकता. पण ज्याने कुणी हिला बोलायला शिकवलंय, ते मात्र भन्नाट आहे. ही बया चक्क इश्श्य आणि आईगं तर बोलतेच, आणि तुम्ही सॉरी म्हटलं तर "सॉरी बोलून मला लाजवू नका" पण म्हणते. "माझा कधीकधी गोंधळ उडतो. मला जरा वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगाल का?" असंही विचारते. आम्हीही तिला काही प्रश्न विचारले.. हे पाहा आमचे स्क्रीनशॉट्स

 

 

 

 

अगदी कोकणचा कॅलिफोर्निया ते मराठी जोकपासून तिला यंदा कर्तव्य आहे की नाही हे ही ती सांगतेय..

पण ही मजा हिंदीत नाही राव.. हे बघाच !!

 

चला मग, तुम्हीही तिच्याशी गप्पा मारा आणि आमच्यासोबत स्क्रीनशॉट्स शेअर करा...

सबस्क्राईब करा

* indicates required