मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

सामना ऐनभरात असताना विराटने भांगडा केलाय...हा व्हिडीओ पाहा!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
सामना ऐनभरात असताना विराटने भांगडा केलाय...हा व्हिडीओ पाहा!!

भारताचा कॅप्टन विराट कोहली आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानावर त्याचा वावर हा अतिशय आक्रमक असतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ऐन भरात आली आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांच्या मनातील उत्सुकता वाढत आहे. अशावेळी विराट कोहली आपल्या आक्रमक खेळीसाठी नाही तर भलत्याच कारणासाठी चर्चेत आलाय.

काल फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतासाठी परिस्थिती चांगली नव्हती, पण मैदानावरील स्टँडसवर ढोल वाजत असताना विराट भाऊ स्वतःला रोखू शकले नाहीत. मैदानावरच त्यांनी आपला भांगडा सुरू केला. ढोलच्या तालावर थिरकणारा कोहली बघून भारतीय संघाला ऊर्जा प्राप्त झाली असे म्हणता येईल. कारण दुपार नंतर भारताचा खेळ समाधानकारक झाला होता. 

खेळाच्या सुरवातीला २१ ओव्हर्समध्ये भारताला एकही विकेट मिळाली नव्हती. पण नंतर कोहलीने आपली पद्धत बदलली. मैदानावर फक्त त्याने भांगडा केला असे नाही तर इंग्लिश खेळाडूंची स्लेजिंग पण तो अधूनमधून करत होता. काहीही असले तरी कोहलीचा हा डान्स मात्र सामन्यापेक्षा जास्त प्रसिद्ध झाला आहे. अनेक मीमर्स त्यावर मीम्स पण बनवत आहेत.

तुम्हाला कसा वाटला कोहलीचा नाच?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

रक्तातील साखर आणि कोर्टवरचा 'राडा': अलेक्झांडर झ्वेरेवची जिद्द!
क्रीडा

रक्तातील साखर आणि कोर्टवरचा 'राडा': अलेक्झांडर झ्वेरेवची जिद्द!

लहानपणापासून टाइप १ डायबेटिसचा सामना करत जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेवचा प्रेरणादायी प्रवास.

१५ सप्टेंबर, २०२६

चिकाटी, तंत्र आणि सातत्य: सुनील गावस्कर गौतम राजाध्यक्ष यांच्या शब्दांत!
क्रीडा

चिकाटी, तंत्र आणि सातत्य: सुनील गावस्कर गौतम राजाध्यक्ष यांच्या शब्दांत!

प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी जागवल्या शालेय मित्र आणि भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या आठवणी.

१० जुलै, २०२६

FIFA विश्वचषकाचा खरा विजेता मैदानात नाही, तर फिफाच्या तिजोरीत बसलाय!
क्रीडा

FIFA विश्वचषकाचा खरा विजेता मैदानात नाही, तर फिफाच्या तिजोरीत बसलाय!

फिफा विश्वचषकात खेळाडूंनी घाम गाळून कमावलेल्या रकमेपेक्षा फिफाच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्स कसे जमा होतात? वाचा पडद्यामागचे अर्थकारण.

८ सप्टेंबर, २०२६