computer

'व्हॉटसअॅप'ने आणलेत २ नवीन फिचर्स.....काय काय नवीन असणार आहे पाहा बरं !!

मंडळी, व्हॉटसअॅप दरवेळी नवनवीन फीचर्स आणत असतं. वर्षभरापूर्वी व्हॉटसअॅपने स्टिकर्स आणले होते. आता व्हॉटसअॅप एॅनिमेटेड स्टिकर्स आणण्याच्या तयारीत आहे. एॅनिमेटेड स्टिकर्स हे तुम्ही फेसबुकवर बघितले असतीलच. नाही बघितलेत तर तुम्ही हार्डकोर फेसबुकवासी नाही आहात राव.

तर, व्हॉटसअॅपच्या सर्व मोबाईल व्हर्जन्स आणि वेब व्हर्जन्सवर हे फिचर असणार आहे. या फिचरचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पण एॅनिमेटेड स्टिकर्स बघू शकता. म्हणजेच एॅनिमेटेड स्टिकर्स बघण्यासाठी तुम्हाला व्हॉटसअॅप उघड़ण्याची गरज पडणार नाही. व्हॉटसअॅप सध्या या फिचरची टेस्टिंग करत आहे. लवकरच आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये एॅनिमेटेड स्टिकर्स असतील.

याबरोबरच व्हॉटसअॅप डार्क मोड पण चर्चेत आहे. या फिचर बद्दल तसं फार पूर्वीपासून बोललं जात आहे. मध्यंतरी बातमी आली होती की कंपनीने या फिचरची टेस्टिंग बंद केली आहे म्हणुन हे फिचर येणार नाही. पण राव, काळजी करू नका. नुक़त्याच आलेल्या बातमीनुसार “ऍण्ड्रॉइड क्यु” सिस्टिम मध्ये डार्क मोड आलेला आहे. याचा अर्थ या फिचरसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

तर मंडळी, दिवसेंदिवस व्हॉटसअॅपमध्ये होणारे बदल व्हॉटसअॅपला अधिकाधिक मजेशीर बनवत आहेत. पण व्हॉटसअॅप काय एकटयाने चालविण्याची गोष्ट आहे का मंडळी? चला तर मग तुमच्या मित्रांना पण व्हॉटसअॅपच्या या नविन फिचर्सची माहिती द्या. आणि अश्याच नविनविन माहितीसाठी आमच्या पेजला लाईक करा.

सबस्क्राईब करा

* indicates required