तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी उजळवलं सहा महिने अंधारात बुडणारं गाव!!

मुंबईत पूर कशामुळे येतो? त्याला जबाबदार कोण? त्यावर काय तोडगा काढला पाहिजे? या सगळ्यावर तोंडाला फेस येईपर्यंत चर्चा रंगल्याही आणि त्या तिथेच संपल्याही मंडळी. आपल्याकडच्या यंत्रणेला कधी जाग येईल ते माहित नाही, पण आम्ही आज ज्या गावांबद्दल सांगणार आहोत, तिथल्या प्रशासनाचं कर्तृत्व पाहून तुम्ही चाट पडाल हे नक्की.... 

स्त्रोत

इटलीमधील विगानेला आणि नॉर्वेमधलं रजुकान. ही दोन्ही गावं चारी बाजूंनी उंचच उंच पर्वतांनी वेढलेली आहेत. पर्वतांच्या  मधल्या दरीत वसल्यामुळे हिवाळ्यातील ६-६ महिने या गावांमध्ये सूर्यप्रकाश पोहचायचा नाही. अर्ध्या वर्षाहून अधिक काळ अंधार आणि थंडीचा सामना करीत राहणं म्हणजे काय अवस्था असते याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी. पण तिथलं प्रशासन खर्‍या अर्थाने लोकांसाठी काम करत असावं. कदाचित म्हणूनच त्यांनी अशी काही क्लृप्ती लढवली की ज्यामुळे या गावातील लोकांना आज सुर्यकिरणांचं दर्शन घेणं शक्य झालंय.

विनेलामध्ये १७ डिसेंबर २००६ हा दिवस डे अॉफ लाईट म्हणून साजरा केला जातो. कारण याच दिवशी इथे राहणार्‍या १९७ गावकर्‍यांसाठी डोंगरमाथ्यावर महाकाय आरसे बसवण्यात आले. या मोठाल्या आरशांवर पडणारा सुर्यप्रकाश परावर्तित होऊन विगानेला गावामध्ये पडतो. कॉम्प्युटरवर नियंत्रित होणारे हे आरसे सुर्याच्या बदलत्या मार्गानुसार आपले कोन बदलत विगानलेलाच्याा गावकर्‍यांसाठी प्रकाश देत राहतात. हीच यंत्रणा १८ आक्टोबर २०१३ रोजी नॉर्वे प्रशासनाकडून रजुकान गावातही बसवण्यात आली. इथल्या पर्वतमाथ्यावर एकून ५४९ चौरस फुटाचे तीन महाकाय आरसे आहेत जे ४५० मीटर व्याप्तीचा सुर्यप्रकाश रजुकान गावावर परावर्तित करतात. त्यामुळे थंडीतील सहाही महिने आता या दोन्ही गावातील लोकांना सुर्यप्रकाश आणि उष्णता उपलब्ध झालीये.

स्त्रोत

​​​​​स्त्रोत

बघा भाऊ, आपल्या लोकांसाठी त्यांनी भौगोलिक प्रतिकूलतेवर किती सहजसोप्या पध्दतीने उपाय शोधलाय. बघा दिसतंय का आपल्याकडे असं काही...

सबस्क्राईब करा

* indicates required