जपान मधील 'टॉयलेट गॉड' !!

मंडळी, आपल्या भारतीय वेदांमध्ये इंद्र, वरुण, अग्नी, मित्र इत्यादी देव नैसर्गिक गोष्टींचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे बघा, अग्नी ही देवता आग या तत्वाशी जोडली गेलेली आहे, इंद्र पर्यावरणाशी इत्यादी. आता देव आहे की नाही हा वादाचा मुद्दा झाला, पण नैसर्गिक शक्तींना देव मानण्याची आपली परंपरा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. जपानमध्ये अशीच एक देवता आहे जी शौचालयाशी जोडलेली आहे. या देवतेला ‘कवाई कामी’ असं म्हटलं जातं. ही देवता आरोग्य, कल्याण आणि प्रजननाशी संबंधित आहे.

शौच म्हटलं की आपल्याला एकप्रकारे घाण वाटू शकते. पण जपान मध्ये याचाच उत्तम खत म्हणून वापर केला जातो. हे ‘ह्युमन वेस्ट’ जमा करून तळात साठवले जाते आणि काही काळाने खत म्हणून वापरले जाते. चांगल्या प्रतीचं खत तयार व्हावं म्हणून ‘कवाई कामी’ या देवतेला आवाहन केलं जातं. तसेच जिथे हे साठवलं जातं तिथे पडून कोणाचा जीव जावू नये म्हणून देखील प्रार्थना केली जाते. चांगलं आरोग्य आणि चांगलं पिक या संदर्भात जोडलेली असल्याने कवाई कमी देवता जपानमध्ये महत्वाची ठरते.

स्रोत

इतर देवांची जशी पूजा होते अगदी तशीच पूजा या देवतेची केली जाते. नवीन वर्षाला या देवतेची पूजा केली जाते. ही देवता सुंदर असल्याचं समजलं जातं. त्यामुळे शौचालय अगदी साफ आणि नीटनेटके ठेवण्याचा इथे नियम आहे. शौचालय घाणीने भरलेलं असेल तर मुलाच्या जन्मावर परिणाम होत होतो असा समज आहे. त्यामुळं जपानमध्ये स्वच्छतेवर जास्त भर दिला जातो.

कोणी म्हणेल की अशा प्रकारे देवावर विश्वास ठेवणं थोतांड आहे.  पण मंडळी, या निमित्ताने तिथल्या लोकांना उघड्यावर शौच करावी लागत नाही आणि जे टॉयलेट आहेत ते अगदी साफ आहेत; उलट शौचायालायाच्या वापराने तिथली शेती बहरत आहे ते वेगळंच.

सबस्क्राईब करा

* indicates required