computer

टोंगा ज्वालामुखी- २२ फूट उंच धूर, ४ फूट त्सुनामी आणि ११,००० किमीपर्यंत हानी!! या हाहा:काराचे फोटो तर पाहा..

समुद्राच्या पोटात काय आहे याचा थांग घेणे किती कठीण असते याबद्दल अनेकजण बोलतात. समुद्राच्या पोटात ज्वालामुखीही असू शकतो आणि तो बाहेर आला तर किती विध्वंस होऊ शकतो याचा प्रत्यय जगाला येत आहे. दक्षिण प्रशांत महासागरात एक भयानक मोठा असा ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे.

या ज्वालामुखीतुन निघालेला धूर इतका प्रचंड होता की तो तब्बल २२ किलोमीटरवर वरती गेला. हा स्फोटही इतका जबरदस्त होता की त्यातुन निघालेल्या शॉकवेव्हमुळे ४ फूट उंच त्सुनामी आली. ही घटना अवकाशातून स्पष्ट दिसत होती. जमिनीवर टेहळणी करणाऱ्या सॅटेलाईटसनी हा स्फोट त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, पापुआ न्यू गिनी आणि आसपासच्या इतर छोट्या बेटांच्या भूभागाला ओशनिया खंड म्हणून ओळखले जाते. या बेटांमध्ये एक 'किंगडम ऑफ टोंगा' नावाचा एक देश आहेत. तो खरेतर १६९ बेट समूहांचा बनला आहे. यातल्या हुंगा नावाच्या बेटावरच्या टोंगा ज्वालामुल्खीचा स्फोट झाला आहे. टोंगा देशात्ला असल्याने या ज्वालामुखीचे नावही टोंगा ज्वालामुल्खी आहे.

अमेरिकेचे टेहळणी उपग्रह सगळीकडे फिरत असतात हे सर्वांना माहित आहे. ओशनिया खंडावर टेहळणीसाठी त्यांची नॅशनल ओशिएनिक अँड ॲटमॉस्फियरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) नावाची एक संस्था आहे. या संस्थेच्या एका टेहळणी उपग्रहाला हा ज्वालामुखी पहिल्यांसा दिसला. त्यातून असे दिसले की प्रथम ज्वालामुखीचा स्फोट झाला, मग राख आणि धूर एखाद्या फुग्याप्रमाणे आकाशाकडे झेपावला. हिरोशिमा-नागासाकीचा बाँब फुटल्यानंतर दिसली होती, नेमकी तशीच मश्रुमसारखी आकृती याहीवेळेस दिसली.

या स्फोटामुळे टोंगाची राजधानी नुकुलाओफा येथे ४ फूट उंच त्सुनामी आली आहे. या ज्वालामुखीपासून ती ६५ किलोमीटर दूर असून तिथे असा परिणाम झाला यावरून हे किती मोठे होते याचा अंदाज येऊ शकतो. सध्या या ज्वालामुखी स्फोटामुळे नुकुलाओफा येथे सर्व बाजूने राखेचे थर साचले आहेत. यातून मात्र मानवहानी कुठलीही झालेली नसल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. त्सुनामीमुळे मात्र किनाऱ्यावरील नावा उलटल्या आहेत. मात्र या परिसरातला हा काही पहिला स्फोट नाही. गेल्या महिन्यातही एका ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. पण त्यावेळी तो इतका मोठा नव्हता.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required