computer

हे १० प्राणी फक्त झोपण्यासाठीच जन्माला आले आहेत...माणूस कितव्या नंबरवर आहे बघा !!

झोप प्रत्येक प्राणिमात्रासाठी आवश्यक असते, पण सगळेच प्राणी ७ ते ८ तास झोपत नाहीत राव. विज्ञान म्हणतं की मासे केवळ १० ते १५ मिनिट झोप घेतात तर त्या उलट कोअला नामक प्राणी तब्बल २० ते २२ तास झोपून राहतो. माणसाच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. लहान बाळ १६ ते १८ तास झोपू शकतं तर साधारण माणूस ९ तास झोपू शकतो (यात आळशी लोकांना गृहीत धरलेलं नाही.)

मंडळी, आज झोपेचा विषय काढण्याचं कारण म्हणजे आम्हाला १० असे प्राणी गवसले आहेत ज्यांना बघून कोणालाही वाटेल - 'यांचा जन्मच फक्त झोपण्यासाठी झाला आहे'. चला तर बघुयात ते प्राणी आहेत तरी कोण !! 

१. कोअला

२० ते २२ तास

२. स्लॉथ

२० तास

३. ब्राऊन बॅट

१९.९ तास 

४. जायंट आर्मॅडिलो (खवले असलेला प्राणी)

१८.१ तास

५. अजगर

१८ तास

६. उत्तर अमेरिकेचा ओपॉसम

१८ तास

७. घुबडा सारख्या तोंडाचे वानर

१७ तास

८. लहान बाळ

१६ तास

९. वाघ

१५.८ तास

१०. झाडावरची चुचुंद्री (Tree Shrew)

१५.८ तास

 

मंडळी, एक प्राणी तर राहिलाच- तुमचा मित्र राव !! तुमच्या आळशी मित्राला tag करा जो या सगळ्या प्राण्यांना मागे टाकू शकतो !!

सबस्क्राईब करा

* indicates required