computer

भारतात आहेत तब्बल ८३१ श्रीमंत व्यक्ती...पहिल्या १० मध्ये कोणाचा नंबर लागतो बघा !!

श्रीमंत म्हटल्यावर आपल्याला अंबानीच आठवतात. नाही का ? पण बार्कलेज हुरुन इंडियाच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत असे एकूण ८३१ गर्भश्रीमंत आहेत राव. बघा तर कोणकोण आहेत या लिस्टमध्ये...

हुरुन ही चीनची रिसर्च फर्म आहे. त्यांनी २०१६ साली पहिल्यांदा भारतातल्या श्रीमंतांची यादी जाहीर केली होती. २०१७ च्या अहवालात भारतात १००० कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले ६१७ श्रीमंत व्यक्ती होते. यावर्षी हा आकडा २१४ ने वाढला असून चक्क ८३१ एवढा झाला आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे ? बरोबर ओळखलं-‘मुकेश अंबानी’ !! मुकेश अंबानी यांनी 3,71,000 कोटी रुपये संपत्तीच्या आधारे पहिला क्रमांक गाठला आहे. त्यांच्यानंतर एस. पी हिंदुजा अँड फॅमिली (1,59,000 कोटी), एलएन मित्तल अँड फॅमिली (1,14,500 कोटी) यांचा समावेश आहे. 

स्रोत

यासोबतच हुरुन इंडियाने श्रीमंत कुटुंबांची नावे दिली आहेत. या यादीतही अंबानी परिवार (३,९०,५०० कोटी) टॉपला आहे. गोदरेज फॅमिलीने या यादीत दुसरा क्रमांक पटकावलाय. त्यानंतर हिंदुजा, मिस्त्री, संघवी या परिवारांचा नंबर लागतो.

या दोन्ही याद्यांखेरीज स्वतःच्या कर्तुत्वावर यशाचं शिखर गढलेल्या महिलांची वेगळी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत किरण मुजुमदार-शॉ (२२,७०० कोटी)!! किरण मुजुमदार या ‘बयोकॉन लिमिटेड’च्या चेअरमन आहेत. त्यांना विज्ञान आणि रसायनशास्त्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘ऑथमेर गोल्ड मेडल’ मिळालं आहे.

किरण मुजुमदार यांच्यानंतर अॅरीस्टा नेटवर्क्सच्या ‘जयश्री उल्लाळ’(९५०० कोटी), आउटकम हेल्थ कंपनीच्या श्रद्धा अग्रवाल (८२०० कोटी) यांचा समावेश आहे.

चला तर आता पाहूयात भारतातल्या १० श्रीमंतांची यादी :

१. मुकेश अंबानी

संपत्ती : ३,७१,००० कोटी रुपये

२. एसपी हिंदुजा अँड फॅमिली

संपत्ती : १,५९,००० कोटी रुपये

३. एलएन मित्तल अँड फॅमिली

संपत्ती : १,१४,५०० कोटी रुपये

४. अझीम प्रेमजी

संपत्ती : ९६,१०० कोटी रुपये

५. दिलीप संघवी

संपत्ती : ८९,७०० कोटी रुपये

६. उदय कोटक

संपत्ती : ७८,६०० कोटी रुपये

७. सायरस एस. पूनावाला

संपत्ती : ७३,००० कोटी रुपये

८. गौतम अदानी अँड फॅमिली

संपत्ती : ७१,२०० कोटी रुपये

९. सायरस मिस्त्री

संपत्ती : ६९,५०० कोटी रुपये

१०. शापूर मिस्त्री

संपत्ती : ६९,४०० कोटी रुपये

सबस्क्राईब करा

* indicates required