सिम कार्ड, बँक अकाऊन्टसाठी आधारकार्ड आवश्यक नाही...पाहा आणखी कोणकोणत्या ठिकाणी आधारकार्डची सक्ती नसेल !!

जिथे बघावं तिथे आधारकार्ड गरजेचं असल्याने नागरिकांच्या गोपनीय माहितीवर डल्ला मारला जातोय का अशी शंका उपस्थित केली जात होती. या शंकेला काही कारणं सुद्धा होती. महत्वाचं कारण म्हणजे गेल्याच महिन्यात TRAI चे चेअरमन शर्मा यांनी आधारकार्ड नंबर देऊन आधार मधली माहिती लिक करण्याचं चॅलेंज दिलं होतं. आणि झालं असं की हॅकर्सनी त्यांची अख्खी कुंडली मांडली आणि त्यांना तोंडावर पाडलं.

TRAI च्या चेअरमन सोबत असं घडू शकतं तर आपण तर सामान्य माणसं ना भाऊ. असो...आजच आधारकार्ड संदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला असून आपल्यासाठी एक चांगली बातमी आली आहे राव.

आधारकार्ड हे वैधच आहे पण प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड सक्तीचं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. यासोबतच कोणत्या ठिकाणी आधारकार्ड सक्तीचं आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही याची यादी सुद्धा दिली आहे. चला तर यादी पाहून घेऊया...

स्रोत

या ठिकाणी आधारकार्ड सक्तीचं नाही.

१. बँक अकाऊंट उघडण्यासाठी

२. मोबाईल सेवा

३. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तसेच यापुढे जुन्या सीमला आधार लिंक करण्याची गरज नसेल.

४. शिक्षण क्षेत्र व विविध परीक्षा (सीबीएसई, नीट)

५. मोबाईल वॉलेट

६. सर्व शिक्षा अभियान

 

या ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य असेल

१. सरकारी अनुदान

२. सरकारी योजना

३. पॅनकार्ड

४. आयटी रिटर्न्स

 

चला तर म्हणजे आपल्याला सदानकदा आधारकार्डची जी गरज लागणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required