computer

Animal Bridgeची कल्पना काय आहे? असंख्य प्राण्यांचे जीव वाचवणाऱ्या Animal Bridge चे १५ नमुने पाहून घ्या!!

माणूस जसजसा जंगल कमी करत गेला तसतसा प्राण्यांशी त्याचा झगडा वाढत गेला. याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. जंगली भागातून गाडीने जात असताना अनेकदा रस्त्याच्या मधोमध वन्य प्राणी आल्याने अपघात घडतात. बरेचदा यात वन्यप्राण्यांचाच बळी जातो. हे होऊ नये म्हणून आजवर बरेच प्रयत्न झालेत. जसे की अंधारात चमकणाऱ्या रंगाने रस्त्यांवर खुणा केल्या जातात किंवा बॅरिकेडिंग केलं जातं. या उपायांनी पण अपघात हे घडतातच. तिसरा एक पर्याय मात्र चांगलाच कामी आल्याचं दिसून आलं आहे. हा पर्याय म्हणजे पूल.  

जंगलाच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी प्राण्यांकडे रस्ता ओलांडण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. याच वेळी जर रस्त्यावरून गाडी येत असेल तर चकमकी घडतात. हे होऊ नये म्हणून खास प्राण्यांसाठी पूल बांधण्याची कल्पना जगभरात लोकप्रिय झालेली दिसत आहे. जगभरात याला Animal Bridge म्हणून ओळखलं जातं. रस्त्यावरून खास वन्य प्राण्यांसाठी पूल तयार केलेला असतो. एकदा का प्राण्यांना या पुलाची सवय  झाली की ते रस्ता न ओलांडता पुलाचा वापर करतात. 

याखेरीज काही ठिकाणी रस्त्यांखालून प्राण्यांसाठी मार्ग करून देण्यात आला आहे. अमेरिकेत न्यू इंग्लंड भागात तर सॅलॅमँडर प्राण्यासाठी खास भुयार खणण्यात आले आहेत. एकंदरीत माणूस आणि प्राणी यांच्यात अपघात घडणार नाही यासाठी दोघांचेही मार्ग वेगळे करण्यात आलेत. ही कल्पना इतर उपायांपेक्षा जास्त परिणामकारक ठरल्याचं दिसून आलं आहे. 

आजच्या लेखात आपण जगभरातील खास प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेले रस्ते पाहणार आहोत. मानव आणि प्राणी यांच्यातला संघर्ष कायमचा मिटवता तर येणार नाही पण अशा उपायांनी  त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल.

१. जर्मनी

२. माँटाना, अमेरिका

३. अल्बर्टा, कॅनडा

४. खास कासवांसाठी तयार करण्यात आलेलं भुयार

५. बॅनफ राष्ट्रीय उद्यान, कॅनडा

६. व्हिक्टोरिया येथील रोप ब्रिज

७. वॉशिंग्टन येथील खारीसाठी तयार करण्यात आलेला पूल

८. माकड आणि इतर प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेला पूल, ब्राझील

९. डुइनपोर्ट, नेदरलँड्स

१०. ब्राबांत, नेदरलँड्स

११. न्यू जर्सी, अमेरिका

१२. केनिया

१३. न्यू इंग्लंड, अमेरिका

१४. कोलोरॅडो

१५. कॅनडा

सबस्क्राईब करा

* indicates required