हा शब्द का ओळखला 'जाईल वर्ड ऑफ दि इयर' ? २०१८ चा आणि या शब्दाचा काय संबंध आहे ?

वर्षभरात सर्वाधिक वापरला गेलेला शब्द किंवा त्या त्या वर्षाचं प्रतिनिधित्व करणारा शब्द हा ऑक्सफर्डद्वारे ‘वर्ड ऑफ दि इयर’ म्हणून घोषित करण्यात येतो. २०१८ चा ‘वर्ड ऑफ दि इयर’ आहे “Toxic” म्हणजे "विषारी". चक्क विषारी हा शब्द ऑक्सफर्डने का निवडला ? चला जाणून घेऊया !!!

ऑक्सफर्डने म्हटलं आहे की Toxic (विषारी) हा शब्द यावर्षी अनेक संदर्भात वापरण्यात आला मग तो राजकारणासाठी असो, पर्यावरणाच्या संदर्भात असो किंवा सध्या चर्चेत असलेली #MeToo चळवळी बाबत असो. त्यामुळे यावर्षी Toxic शब्दाला निवडण्यात आलं आहे.

स्रोत

मंडळी, Toxic सोबत “gaslighting,” “incel” आणि “techlash.” हे शब्द देखील अंतिम यादीत होते. पण ऑक्सफर्डच्या निवड समितील Toxic हा योग्य शब्द वाटला.

मंडळी, ऑक्सफर्डने निवडलेला शब्द हा त्या वर्षाचा एकंदरीत कल किंवा गुणवैशिष्ट्य दाखवून देतो. म्हणजे हे वर्ष ‘विषारी’ तत्वांनी भरलेलं होतं असा याचा अर्थ होतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? हे वर्ष खरंच विषारी होतं का ? तुमचं मत सांगा मंडळी !!

सबस्क्राईब करा

* indicates required