computer

तुर्की पोलिसांनी प्रवाशालाच प्लास्टिकमध्ये गुंडाळलं....असं कोणी करतं का?

कधी कोणत्या प्रवाशाला प्लास्टिकने बांधून विमानात कोंबताना पाहिलंय का? तुर्कस्तानातील पोलिसांनी हा अजब प्रकार खरोखर केला आहे. तुर्की पोलिसांनी ४७ वर्षांच्या एका प्रवाशाला प्लास्टिकमध्ये बांधून त्याच्या देशाकडे जाणाऱ्या विमानात पाठवून दिलं. हा व्हिडीओ पाहा.

या प्रवाशाचं नाव आहे इमॅन्युएल. तो आफ्रिकेतल्या कॅमरून नावाच्या देशाचा रहिवासी आहे आणि तो काही कामानिमित्त दुबईला निघाला होता. सलग ८ तास प्रवास करून विमान तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल येथे थांबलं असताना तो विमानाबाहेर निघाला. त्याच्याकडे ट्रान्झिट विझा असल्याने दुबई येथे उतरण्यास त्याला काही गैर वाटलं नाही, पण विमानतळ अधिकाऱ्यांनी त्याचे कागदपत्र तपासल्यावर आढळलं की त्याचा ट्रान्झिट विझा खोटा आहे. त्याला लगेचच अटक करण्यात आली.

इमॅन्युएलने कॅमरून मधून निघण्यापूर्वी एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून आपल्या प्रवासाचा सर्व बंदोबस्त केला होता. पण गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या  नाहीत. 
पकडल्यानंतर इमॅन्युएलला चौकशीसाठी नेण्यात आलं. तोवर त्याच्या पार्टनरलाही पकडण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला एका कागदपत्रावर सही करण्यास सांगितलं. कागदपत्रे तुर्की भाषेत असल्याने त्याने सही करण्यास नकार दिला. त्याने वकिलाची मागणी केली ती नाकारण्यात आली. इमॅन्युएल म्हणतो की तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याला मारलं आणि त्याचे २४०० डॉलर्स हिसकावून घेतले. जाता जाता त्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला की ‘तू जिवंत आहेस ही मेहरबानी समज’.

चौकशी आणि लुटालूट झाल्यांनतर इमॅन्युएलवर कॅमरूनला परत जाण्यासाठी सक्ती करण्यात आली. त्याने नकार दिल्यानंतर  त्याला जबरदस्तीने प्लास्टिकमध्ये गुंडाळून विमानात ढकलण्यात आलं. त्याच्या तोंडात बोळा कोंबण्यात आला. अधिकारी निघून गेल्यावर तोंडातला बोळा बाहेर काढण्यात तो यशस्वी झाला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर इतर प्रवाशांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली. इतर  प्रवाशांनी याविरोधात आवाज  उठवला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 

तर मंडळी, तुर्की अधिकाऱ्यांनी जे केलं तसा प्रकार आजवर कोणी केल्याचं आम्ही  तरी ऐकलेलं नाही. तुम्ही असा प्रकार कधी पाहिलाय का?

सबस्क्राईब करा

* indicates required