भाऊ, मुंबई किनाऱ्यावर पकडलेल्या एका माशानं या भावांचं नशीब पालटलं...

राव, लॉटरी कुठेही, कधीही, केव्हाही लागू शकते. आता ही बातमीच बघा ना. पालघर मधल्या मुरबे भागातल्या दोन मच्छीमारांच्या जाळ्यात घोळ मासा अडकला. या माशाने दोघा भावांना लखपती केलं आहे राव. या माशाची बोली ५,५०,००० रुपये एवढी लागली आहे. आहे की नाही लॉटरी ?

स्रोत

शुक्रवारी महेश आणि भरत मेहेर हे दोघे भाऊ रोजच्याप्रमाणे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात घोळ मासा अडकला. घोळ मासा फारच दुर्मिळ समजला जातो. त्यामुळे घोळ हाती लागणं म्हणजे आपली  लॉटरी  लागली आहे असंच समजलं जातं. तसं बघायला गेलं तर घोळ माश्याच्या मासाला ८०० ते १००० रुपये प्रतिकिलो भाव आहे. पण घोळच्या मासा पेक्षा खास असतो तो त्याचा ‘बोथ.

स्रोत

मंडळी, बोथ म्हणजे फुफ्फुसाची पिशवी. या बोथाचा उपयोग वैद्यकीय कामांसाठी केला जातो. सौंदर्य प्रसाधनं, औषधं आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे टाके या बोथापासून तयार केले जातात. बोथासोबतच घोळच्या शेपटाचा वापर वाईन शुद्धीकरणासाठी केला जातो. त्यामुळे जगभर घोळला मोठ्याप्रमाणात मागणी असते. महेश आणि भरत यांनी पकडलेला घोळ ३० किलो होता तर त्याच्या बोथाचं वजन ७२० ग्राम एवढं होतं. त्याच्या आकारामुळेच त्याची किंमत सुद्धा मोठी ठरली.

चांगल्या दर्जाच्या घोळला मलेशिया, हॉंगकॉंग, सिंगापूर, जपान भागात पाठवलं जातं. कदाचित या घोळची रवानगी सुद्धा भारताबाहेर झाली असेल.

या आधी भाईंदरच्या विल्यम गब्रू नावाच्या मच्छिमाराला असाच एक घोळ मासा सापडला होता. त्याची बोली किंमत ५,१६,००० रुपये लागली होती. पण मेहेर बंधूंच्या माशाने हा रोकॉर्ड तोडून आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required