computer

भाऊ आपल्या लातूरच्या निलंग्यात झूम केल्यावर काय दिसतं पाहा !!

लातूर येथील निलंग्यात देशातील पहिली गवताची प्रतिमा साकार झाली आहे. तीही आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची. पण त्याहून महत्वाची बातमी काय आहे माहितीये मंडळी? तर ही प्रतिमा चक्क गुगल मॅपवर आली आहे. तुम्ही गुगल मॅपवर सर्च केल्यास तुम्हाला महाराजांची गवताने तयार केलेली प्रतिमा दिसेल. हा खऱ्या अर्थाने कलाकाराचा आणि त्याच्या कलेचा गौरव आहे मित्रांनो. कारण एखादी गोष्ट गुगल मॅपवर दिसणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी त्या ठिकाणाचे काहीतरी महत्व असावे लागते. त्यामुळे सगळीकडे या प्रतिमेची चर्चा आहे. मंडळी या प्रतिमेसाठी निलंग्यात स्पेशल शेत तयार करण्यात आले होते. त्या शेतात ही प्रतिमा तयार करण्यात आली. महाराजांच्या या भव्य कलाकृतीचे निर्माण अक्का फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

तब्बल 2.5 लाख स्केवर फूट शेतात तयार करण्यात आलेली ही प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे राव!! गवत उगवून तयार केलेली ही प्रतिमा मंगेश निपाणीकर यांनी तयार केली आहे. 

मंडळी हेवा करावा तर तो चांगल्या गोष्टीचा!! सगळीकडे वाईट गोष्टिंचा हेवा करणारे वाढत असताना चांगल्या गोष्टिंचा हेवा कसा बदल घडवू शकते हे मंगेश भाऊंनी दाखवून दिले आहे. मागच्या वर्षी अरविंद पाटिल निलंगेकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून शिवाजी महाराज साकारले तेव्हाच या गडीने ठरवले, आपण पण महाराजांना वेगळ्या पद्धतीने मानवंदना देऊ, आणि साकार झाली महाराजांची गवतावर कोरलेली प्रतिमा!! मंडळी पण गवताची प्रतिमा तयार करने म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी मंगेश भाऊंनी प्रचंड मेहनत घेतली. मेहनतीशिवाय एवढी भारी कलाकृती निर्माण होणे कसे शक्य आहे राव!! याच्यासाठी त्यांनी सात दिवस आधी निलंग्यातील दाबका रोडकर 6 एकर जागेवर गवत उगवले. जेव्हा गवत सुकून त्यात शिवाजी महाराज दिसायला लागले, तेव्हा मात्र सगळ्यांची बोटे तोंडात गेली ना राव!! 

मंडळी महाराजांची गवताची प्रतिमा तयार करायची म्हटल्यावर सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला पाहिजेत नाही का? आतातर गुगल मॅपवर सुद्धा तुम्ही सर्च केल्यास तिथे तुम्हाला महाराजांची प्रतिमा दिसते. मंगेश निपाणीकर यांनी सांगितले कि ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांना जवळपास दीड हजार किलो गवत लागले. आधी आकृतिची साइज किती ठेवायची हे ठरवून मग त्या हिशोबाने गवताची लागवड केली गेली. प्रतिमेला अजुन चार चांद तेव्हा लागले जेव्हा मंगेश भाऊंना या प्रतिमेला थ्रीडी इफेक्ट देण्याची कल्पना सूचली मग काय भाऊ लागले कामाला. आणि प्रतिमेला थ्रीडी इफेक्ट देऊनच शांत झाले. मंडळी ही प्रतिमा सगळ्यांना पाहने शक्य व्हावे यासाठी ज्या शेतात ही प्रतिमा तयार केली आहे त्या शेताभोवती चार स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.

मंडळी, लातुरकर दरवर्षी काहीतरी नविन करत असतात. मागच्या वर्षी लातूर येथे देशातील सर्वात मोठी रांगोळी काढण्यात आली. अभिमानाची गोष्ट म्हणजे ती शिवाजी महाराजांची होती. अडीच एकर परिसरात तयार करण्यात आलेली ही रांगोळी 50 हजार किलो रंग वापरून तयार करण्यात आली होती. तब्बल 50 पेक्षा जास्त कलाकारांनी ही रांगोळी तयार करण्यासाठी मेहनत घेतली होती. 72 तास चाललेल्या कामानंतर रांगोळी तयार झाली होती. ही रांगोळीची प्रतिमा तयार व्हावी म्हणुन अरविंद पाटिल आणि मंगेश निपाणीकर दोन्ही सामिल होते.

मंडळी तुमच्या आजुबाजुला कोणी असे भन्नाट कलाकार असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...

सबस्क्राईब करा

* indicates required