गणेशोत्सव स्पेशल : गुहागरच्या या बाप्पाला का म्हणतात 'उफराटा गणपती'??

चिपळूण हे गोवा मार्गावरचं महत्त्वाचं शहर. तिथूनच गुहागरला जायला फाटा फुटतो. साधारण पन्नास किलोमीटरवर असणारा इथला  समुद्र किनारा आताशा चांगलाच अनेकांच्या परिचयाचा झालाय.  कोकण म्हणजे नारळाची वाडी, आमराई हे सगळं आलंच की हो.. अशाच खाशा कोकणातल्या गुहागर या ठिकाणी आहे उफराटा गणपती. म्हणजे कसा आपला पत्र्या मारुती किंवा खुन्या मुरलीधर आहे ना, अगदी तसाच !!

स्रोत

या गणपतीची कथा अशी सांगितली जाते की  हा कोळ्यांना समुद्रात सापडला. त्यांनी ती मूर्ती समुद्रातून आणून विधीपूर्वक त्याची स्थापना छोट्या मंदिरात केली. पण पुढे गावात समुद्राचं पाणी शिरलं आणि चक्क गावच बुडण्याची वेळ आली. कोळ्यांनी आणि लोकांनी साहजिकच या पूर्वभिमुख गणपतीची आराधना संकटनिवरणासाठी केली. " संकटी पावावे" यासाठी प्रसिद्ध असलेला गणराया प्रसन्न झाला आणि त्याने पश्चिमेला तोंड वळवून कटाक्ष टाकला. काय सांगावं?  समुद्राची फ्या फ्या झाली नि आक्रमण जाऊन गावचं संकट टळलं. तेव्हापासून विघ्नहर्ता उफराटा गणपती नावाने तो ओळखला जाऊ लागला. 

कशी आहे ही उफारट्या गणपतीची मूर्ती ??

स्रोत

डाव्या सोंडेची, पांढर्‍या शुभ्र दगडाची, गळ्यात नाग-पुतळ्या, चार हातात मोदक, त्रिशूल, कमलपुष्प, परशु असलेली ही मूर्ती आकर्षक आहे. विशेष म्हणजे या मूर्तीला मुकुटच नाहीय. असं असूनही मूर्ती खूपच रेखीव आहे आणि कोळी समाजाची या गणपतीवर मोठी श्रद्धा आहे. मूर्ती एकदंती आहे. अर्थातच सुपासारखे कान आणि पायात मोठे वाळे असलेली आहे. निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या या गावात आताशा बर्‍याच सुविधा आहेत.  संस्थेचं सुसज्ज निवासस्थान आहे. पर्यटनाच्या नि फिरस्तीच्या लोकांना या गणपतीचं येड लागलंय बरं!

सबस्क्राईब करा

* indicates required