अशी लग्नपत्रिका तुम्ही कधीच पाह्यली नसेल ! वाचा, या बाबांनी काय केलं जे सर्वांनीच खरंतर करायला हवंय !!

आजही भारतात हुंडा देणे आणि घेणे ही प्रथा संपलेली नाही. मुलगी जन्माला आली की आजही अनेक बापांच्या कपाळाला आठ्या पडतात त्या याच कारणाने. हुंडा द्यावा लागणार म्हणून मुलींचा जन्म नकोसा वाटतो. मंडळी, ही एक प्रकारे भारतीय समाजाला लागलेली कीड आहे.
एक चांगली गोष्ट म्हणजे आजच्या युगात या प्रथेविरुद्ध आवाज उठवणारे देखील तेवढ्याच संख्येने आहेत. अशाच एका माणसाला आज आपण भेटणार आहोत. वरील फोटो मध्ये दिसणारी व्यक्ती आहेत ‘रामदयाल सिंह’. ते मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथे राहतात. त्यांच्या मुलीचं लग्न २० जून रोजी पार पडलं. त्यांनी आपल्या मुलीचं लग्न ज्या प्रकारे केलं ते बघून समाजाला एक नवीन उदाहरण मिळालं आहे.
रामदयाल यांनी गुर्जर समाजात एक नवा पायंडा घालून दिला आहे. त्यांनी हुंडा देण्यास साफ नकार तर दिलाच पण त्याचबरोबर आपल्या मुलीच्या लग्नात किती खर्च झाला किंवा होणार आहे हे चक्क पत्रिकेत छापून दिलं. ही पत्रिका म्हणजे आजवर कधीही न पाहिलेली पत्रिका आहे.
लग्नात होणारा भरमसाठ खर्च आणि दिखावा टाळण्यासाठी त्यांनी पत्रिकेत किमान खर्च केला आहे. हा खर्च पुढील प्रमाणे.
भटजींचा खर्च : ११००
शगुन : ११००
थाळी : ५१००
दरवाजा रुकाई (दरवाजा अडवण्याचा लग्नातील प्रकार) : ११००
भात (प्रथा) : ५१००
अंक माला : १०
टीका : ५०
पान व ५ भांडी -कुलर, कपाट आणि पलंग : ११००
यासोबत वऱ्हाडी म्हणून फक्त १०० लोक येऊ शकतील अशी अट त्यांनी नमूद केली आहे.
लग्न म्हटलं की धिंगाणा आलाच. पिऊन गोंधळ घालण्यासाठी व जुनी भांडणे उकरून काढण्यासाठी लग्नाचा रंगमंच निवडला जातो. हा प्रकार घडू नये म्हणून पत्रिकेत स्पष्ट शब्दात ‘लग्नाला येताना दारू पिऊन येऊ नका’ असं लिहिलं आहे.
मंडळी गुर्जर समाजात दारू बंदी झाली आहे आणि आता हुंडाबंदी व्हावी म्हणून हे पाहिलं पाऊल उचललं गेलंय. या संदर्भात पत्रिकेतल्या खालील ओळी महत्वाच्या आहेत.
मृत्यु भोज और माला छूटी, खाना छूटा मेज पे, बाजे छूटे दारु छूटी, अबकी चोट दहेज पे ।
मंडळी, गुर्जर समाजात हुंडा न देणारे रामदयाल हे पहिले व्यक्ती ठरले आहेत. हुंड्याच्या विरोधात अशाच ‘बाप’ माणसांनी उभं राहण्याची आज गरज आहे.
आणखी वाचा :
या नवर्यानं जे केलं ते आपण करू शकतो का ?
अजब लग्नाची गजब कथा : जिथे लग्न करणारेही जुळे, लग्न लावणारेही जुळे !!
मरण्याच्या १८ तास आधी तिने केलं लग्न...वाचा ही प्रेमाची अनोखी गोष्ट !!
...आणि शेरवानीने घात केला !! वाचा दोन लग्नात एकच कपडे वापरून कसा अडकला नवरदेव !!