computer

तुमच्या सुंदर रेशमी साड्यांना पुन्हा उपयोगात आणण्याच्या ८ हटके आयडिया..

सुंदर साडी दिसल्यावर ती घ्यायचा मोह होतोच, पण ती नेसायची म्हटलं तर तसा चांगला प्रसंग हवा. मग एकदा नेसलेली साडी परत पुन्हा तेच लोक समारंभात असतील तर नेसता येत नाही. आजकाल साडी हा खास पोषाख आहे, त्यामुळं घेताना चांगल्या क्वालीटीची म्हणजेच  महाग असलेली साडीच खरेदी केली जाते. त्यामुळं याचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तसा कमीच. 

या वर्षीच्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात उर्मिला कानेटकरने घातलेला सिल्क साडीचा इव्हिनिंग गाऊन तुम्ही पाहिला असेलच. तुम्हांलाही जर तुमच्या खास साड्या अशा वेगळ्या प्रकारे उपयोगात आणायच्या असतील, तर आम्ही घेऊन आलो आहोत काही उपाय. पण हो, हे उपाय करण्याआधी चांगला शिंपी शोधा. नाहीतर साडी नाही आणि ड्रेसही नाही, अशी परिस्थिती व्हायची.  

१. कॅज्युअल लॉंग ड्रेसेस

यासाठी तुमच्याकडे खास सिल्क साडीच असायलाच हवी, असं नाही. खरंतर कॅज्युअल प्रसंगासाठी सिल्क साडी नकोच. मस्त बॉर्डर असलेली कॉटन साडी, एखादी तलम माहेश्वरी किंवा ब्लॉक प्रिंट असलेली साडी यासाठी मस्त चालून जाईल. अगदी आपल्या हैद्राबादच्या मंगलगिरी कॉटन किंवा खणाचं कापडाचे ड्रेसेसही सुंदर दिसतील आणि तुमची स्टाईल सगळ्यांपासून हटके असेल. 

(वरच्या फोटोतील पहिल्या आणि  तिसर्‍या ड्रेसचा फोटो  हा रावी या पानावरून घेतला आहे.)

२. शॉर्ट ड्रेसेस

यासाठी मात्र सिल्क साड्याच हव्यात. पण हो, त्या टिपिकल काठपदर असलेल्या नकोत. पण रूंद काठ असलेल्या साड्या अगदी चालतील.  काठांचा कधी योकसाठी तर कधी घेरासाठी उपयोग करून छान सेमीफॉर्मल ड्रेस तयार होईल. नाहीतर योकसाठी कलमकारी किंवा खणाचं कापड वापरलंत तर साडीचा ड्रेस आहे असं कुणाला वाटणार देखील नाही.

(वरच्या फोटोतील मधल्या ड्रेसचा फोटो हा ’रावी’वरून घेण्यात आला आहे)

३. फन विथ बॉर्डर

काठपदर असलेल्या, बनारसी किंवा साऊथ सिल्क साड्यांचं काय करायचं हा प्रश्न पडला असेल ना मग?  एकतर या साड्या अत्यंत तलम असतात आणि त्यांच्या बॉर्डरही वर्षानुवर्षं छान टिकतात. या बॉर्डर्सचा कलात्मक वापर करून ड्रेसेस  किंवा छान इव्हिनिंग गाऊन्स बनवता येतील. या बॉर्डर कधी कमरेजवळ तर कधी घेरासाठी वापरता येतील. किंवा मग दोन साड्यांचं लेअरिंग करून कॉन्ट्रास्ट गाऊनही बनवता येईल. 

४. बॉर्डर गाऊन्स

असाही साडीच्या बॉर्डरचा मस्त उपयोग करता येईल. 

५. ब्लॅक मॅजिक

काळा रंग सगळ्यांचा आवडता असतो, नाही? आणि माहित आहे का, काळ्या रंगाच्या कपड्यात आपण आहोत त्याहून थोडे बारीकही दिसतो. 

या काळ्या साड्यांच्या काठांचा उपयोग करून कुर्ती, नी लेंग्थ ड्रेसेस किंवा गाऊन्स असं काहीही बनवता येईल. यात तुम्ही जितकी कलाकारी दाखवाल, तितका तुमचा ड्रेस एकदम हटके दिसेल. 

६. जॅकेट्स

आजकाल जॅकेट्सचीही खूप चलती आहे. प्लेन ज्यूट किंवा खादी सिल्कच्या साडीच्या कापडाला वेगळया लेसची बॉर्डर लावता येईल.  साडीतून शॉर्ट ड्रेस बनवून उरलेल्या कापडाचा छान उपयोग होईल ना? जॅकेट्समध्येही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हांला हवा तो प्रकार तुम्ही निवडू शकता. नाहीतरी कलमकारी, इकत, पटोला, बनारस सिल्क कधी कामाला येणार मग?

७. पल्लू ड्रेसेस

हा आहे नी-लेंग्थ ड्रेसचा थोडासा वेगळा प्रकार. यात समोरून वन शोल्डर ड्रेस, पण मागून झोकात सोडलेला पदर असं छान कॉंबिनेशन आहे. यासाठी साडी रेशमी असायलाच हवी असं नाही, पण कोणतीही मऊसूत साडी, जी सहसा फुगत नाही, अशी साडी या प्रकारासाठी एकदम बेस्ट ठरेल.  यातही घेरदार ड्रेस किंवा स्ट्रेट फिट असे दोन्हीही पर्याय सुंदर दिसतील. 

८. कफ्तान

बारीक काठाची  साडी असेल तर कफ्तान हा ही एक उत्तम पर्याय आहे.

 

या सर्व भन्नाट आयडियांसाठी बोभाटा.कॉम pinterest.comचे आभारी आहे.  तुम्हांला आणखी काही पर्याय हवे असतील किंवा तुमच्याकडे काही कलात्मक आयडियाज असतील, तर तुम्हीही pinterest वर त्या सगळ्यांसोबत शेअर करू शकता. अर्थातच, बोभाटा.कॉम आणि pinterest.com यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. 

मग,  तुम्ही तुमच्या साड्यांना कसं उपयोगात आणणार? कमेंट्समध्ये आम्हांला नक्की कळवा आणि तुमच्या इतर आयडियाही आमच्यासोबत शेअर करा.. 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required