बापरे!! ४५,०००० ची स्लीपर? यावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया याहून जास्त अनमोल आहेत राव !!

राव, महागड्या चपलांची किंमत किती असावी ? विचार करा !! आपण जास्तीतजास्त १० किंवा १५ हजार रुपयांपर्यंत गृहीत धरू. पण अमेझॉन वर एक नवीन ‘स्लीपर'’ विक्रीस आली आहे. या स्लीपरची किंमत आहे तब्बल ४५ हजार रुपये. बसला ना धक्का ? अमेझॉनवाले नेहमी प्रोडक्टची माहिती देताना जी माती खातात तसं इथे घडलेलं नाही. या स्लीपरची खर्रर्रच किंमत ४५ हजार आहे. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया.
Valentino आणि Havaianas या दोन कंपन्यांनी मिळून ही महागडी स्लीपर तयार केली आहे. तसं पाहायला गेलं तर ४५,००० च्या स्लीपरला ४५० ची पण किंमत दिसत नाहीये पण आता हे लोक म्हणतायत की ४५,००० ची आहे तर आहे.
तर, या स्लीपर मागवायच्या असतील तर त्या फ्री मध्ये डिलिव्हर होणार नाहीत. त्यासाठी वेगळे ७६६ रुपये आयात कर म्हणून द्यावे लागणार आहेत. जर तुमच्या खिशात ४५ हजार रुपये नसतील तर घाबरू नका. या भल्या कंपनीने EMI ची सुविधा पण दिली आहे. २,००० पासून सुरु होणाऱ्या EMI वर तुम्ही या स्लीपर्स विकत घेऊ शकता. मग याच स्लीपर्स घालून जन्मभर कर्ज फेडण्यासाठी तुम्ही मोकळे.
राव, या स्लीपरपेक्षा जास्त कौतुक होत आहे ते यावरच्या प्रतिक्रियांचं. अमेझॉनवर या स्लीपर विक्रीस ठेवल्यानंतर त्यावर लाखमोलाच्या प्रतिक्रिया आल्या. ४५ हजार तर या पुढे काहीच नाही. काय आहेत त्या प्रतिक्रिया ? तुम्हीच बघा.
एकंदरीत आजवर फक्त आयफोनसाठी किडनी विकावी लागत होती. आता स्लीपरसाठी पण किडनी विकावी लागणार आहे. आता तुम्हीच सांगा तुम्ही कोणाची किडनी विकणार ??