व्हिडिओ ऑफ द डे: हंपीच्या मंदिरातल्या अवशेषचे खांब पाडणारे हे काही महान लोक. कुठून येतात असे लोक??

मंडळी न्यूयॉर्क टाइम्सने हंपीला मोस्ट डिझायर्ड टुरिस्ट डेस्टिनेशनच्या यादीत दुसरे स्थान दिले होते. आम्हीही तुम्हाला हम्पी मध्ये बघण्याच्या काही स्थानांची यादी दिली होती. पण शुक्रवारी एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यात दोन लोक एका मंदिराच्या अवशेष म्हणून उरलेला  खांब पाडताना दिसत आहे. हा विडिओ एका युजरच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून करण्यात आलेला दिसतो. गंमतीची बाब म्हणजे हम्पी ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे.

 

आता असा व्हिडिओ व्हायरल नाही झाला तरच नवल!! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोक रस्त्यावर उतरले. त्यांचे म्हणणे आहे की आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी अशा जागेची विशेष काळजी घ्यावी. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता पिलर्स जमिनीवर पडलेले आढळले. पोलिसांनी व्हिडिओ मधील लोकांना लवकरात लवकर शोधून काढायचे ठरवले आहे.

आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया च्या म्हणण्यानुसार हा व्हिडीओ एक वर्षापूर्वी रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तीन दिवसापूर्वी त्यांनी हे खांब उभ्या अवस्थेत पाहिले आहेत. जर व्हिडिओ १ वर्षापूर्वीचा असेल तर त्यावेळी तक्रार करण्यास का नाही आली हा पण प्रश्नच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही नासधूस करणारी वृत्ती आपल्यामध्ये कुठून येते. असे करण्यातून या लोकांना काय आनंद मिळतो!!

सबस्क्राईब करा

* indicates required