computer

या माणसाच्या पॅन्टवर चक्क मधमाशांचं पोळ तयार झालंय....व्हिडीओ पाह्यला का ?

नागालँडची ओळख तशी तिथल्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीमुळे आहे. त्याचप्रमाणे नागालँड मधमाशांच्या पोळ्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तिथे लोकं मधमाशा आणि मधाचा व्यवसाय करतात. एवढेच नाही, तर पूर्ण नागालँडमध्ये ५ डिसेंबरला मधमाशी दिवससुद्धा साजरा करण्यात येतो.

मंडळी, मधाच्या पोळ्याचे काही खरे नसते. एखाद्याच्या घरात ते बसले म्हणजे घरात येण्याजाण्याचे वांदे होतात. चुकून त्यांना कुणाचा धक्का लागला तर थेट जीवाचा धोका निर्माण होतो. मधमाश्यांचे पोळे उठल्याने अनेक लोकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. एखाद्या झाडावर पोळे असेल तर लोक त्या झाडाखाली फिरणे देखील बंद करतात. कधीकधी पूर्ण इमारतसुद्धा रिकामी करावी लागते. त्यातही काही धडाकेबाज गडी असतात ते अंगावर ओरखंडाही येऊ न देता मोठेमोठे मधमाश्यांचे पोळे उध्वस्त करतात. 

सध्या मधमाशा मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत राव!! नागालँडचे मंत्री किरण रिजीजु यांनी ट्विटरवर एक विडिओ शेयर केला आहे, त्यात चक्क एका माणसाच्या पॅन्टवर मधमाशांचे पोळ तयार झाले आहे. त्या विडिओला त्यांनी कॅप्शन दिले आहे की हे फक्त नागालँडमध्ये होऊ शकते.

तिथे मधमाश्या पोचल्या कशा आणि त्यांनी एवढे मोठे पोळे तयार करेपर्यंत हा भाऊ काय करत होता हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कारण मधमाश्या एका दिवसात एवढे मोठे पोळे तयार करत नाहीत,  हळूहळू मध गोळा करून मग पोळे बनते. 

त्या तरुणाचा व्हिडिओ थेट मंत्र्यांनी शेयर केल्यामुळे तो वायरल व्हायला वेळ नाही लागला. अनेकांनी त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या, तर अनेक त्यावर जोक करत आहेत.

तुम्ही कधी मधमाशांचे पोळे काढायचा प्रयत्न केलाय का? ते जाऊ दे, दुसरे कुणी पोळे काढताना मधमाशांच्या तडाख्यात सापडलाय का? आम्हांला पण सांगा काय किस्सा घडला ते...

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required