सध्या ट्विटरवर धुमाकूळ घालत असलेलं #Firstsalary ट्रेंड काय आहे?

ट्विटरवर रोजच्या रोज काहीतरी ट्रेंड होत असते. त्यातले काही ट्रेंड्स मात्र भन्नाट असतात. सध्या असाच एक ट्रेंड ट्विटरवर व्हायरल होत आहे. आपली पहिली कमाई काय होती, असे सांगण्याचा हा ट्रेंड आहे. #Firstsalary या हॅशटॅगचा वापर करून लोक आपली पहिली कमाई आणि पहिल्या कमाईचे किस्से सांगत आहेत. आज कोट्यवधी कमवत असलेले लोक कधीकाळी काही रुपयांसाठी काम करायचे हे आपण बऱ्याचवेळा ऐकत/ वाचत असतो. पण या ट्रेंडच्या माध्यमातून अशा अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या पहिल्या कमाई मागची कहाणी लोकांना समजत आहे.

पहिली कमाई प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय असतो. पहिल्या कमाईतून खरेदी केलेली वस्तू लोक वर्षानुवर्षे सांभाळून ठेवत असतात. या ट्रेंडमध्ये अनेक मोठे सेलेब्रिटी, पत्रकार, राजकीय नेते हिरीरीने सामील होताना दिसत आहेत.

सुप्रसिद्ध सिनेनिर्माता अनुभव सिन्हा यांनी आपली पहिली कमाई ही ८० रुपये असल्याचे सांगितले. आपण इंजिनिअरिंगला असताना 7 वीच्या मुलांची ट्युशन घेऊन हे पैसे कमावले होते, असे त्यांनी सांगितले तर सध्या हिट झालेली वेबसिरिज द स्कॅम १९९२ चे दिग्दर्शक हंसल मेहतांनी आपली पहिली कमाई ही ४५० रुपये असल्याचे सांगितले.

आपल्या पहिल्या कमाईने आईला चांगल्या हॉटेलमध्ये जेवणाला घेऊन गेलेल्या व्यक्तीचा फोटो देखील या निमित्ताने वायरल झाला. या सगळ्यात मीमकरांनी देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

बेरोजगारांना या ट्रेंडचे काय? या पद्धतीचे देखील मीम तयार होत आहेत. काहीही असो पण यानिमित्ताने लोक आपल्या जुन्या दिवसांना उजाळा देत आहेत. तुम्ही देखील तुमची पहिली कमाई आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required