व्हिडीओ ऑफ दि डे : सोशल मिडीयाला वेड लावणारी ही बाप-लेकीच्या जोडी आहे तरी कोण ?

आजचा व्हिडीओ ऑफ दि डे आहे सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेली बाप-लेकीची जोडी. राव, whatsapp च्या स्टेटस मध्ये या जोडीने ठाण मांडलंय. जिकडे तिकडे यांचाच व्हिडीओ दिसतोय. पण व्हिडीओ पाहून कोणाला कंटाळा येत नाहीये. कारण हा व्हिडीओ आहेच इतका मस्त.
राव, व्हिडीओ तर सगळ्यांनी पाह्यला पण व्हिडीओत दिसणारी ती गोंडस मुलगी कोण आहे हे माहित आहे का ? नाही माहित ? चला ओळख करून देतो.
A little post bath lip sync battle the other night
— Trina Wesson (@TrinaWesson) October 8, 2018
Myla is one heck of a lip syncer@adamlevine @maroon5 @TheEllenShow
Follow us on Instagram: @mydarlingmyla
Follow us on YouTube:https://t.co/lVYzucizY9 pic.twitter.com/w16gkhe7Yk
मंडळी, या गोंडस मुलीचं नाव आहे ‘मायला’. ती २ वर्षांची आहे. ती आणि तिचे बाबा ज्या गाण्यावर ‘लीप सिंक’ करत आहेत त्या गाण्याचं नाव आहे ‘Girls Like You’. हा व्हिडीओ मायलाच्या आईने तयार केला असून पहिल्यांदा युट्युबवर अपलोड केला होता. त्यानंतर तो सगळीकडे पसरला. या व्हिडीओने इतकी कमाल केली की ‘Girls Like You’ या गाण्याच्या व्हिडीओचे युट्युबवरचे व्ह्यूज रातोरात वाढले.
मंडळी, सध्या व्हायरल झालेला हा सगळ्यात Cutest Video असावा.... नाही का ?