computer

अटलांटिक महासागरात 'ला पाल्मा' बेटावर ज्वालामुखीने केली वाताहत!! व्हिडीओ बघून घ्या!

अटलांटिक महासागरातील स्पेनचे बेट ला पाल्मा येथे गेला आठवडाभर भूकंपाचे झटके जाणवत होते. पण आता तिथे थेट ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. ज्वालामुखीच्या ज्वाळांनी आपल्या तडाख्यात सापडलेल्या कैक घरांची राख केली. यानंतर घाईगडबडीत लोकांना तेथून हलवण्यात आले.

जवळपास ८५ हजार लोकसंख्या असलेले ला पाल्मा बेट आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ स्पेनच्या ८ कॅनरी बेटांच्या समूहांपैकी एक आहे. ६ हजारांपेक्षा जास्त लोकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या घटनेत कुणी मृत्युमुखी पडले नसले तरी लाव्हारसामुळे किनाऱ्यावरील लोकांना धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

हा स्फोट किती दिवस चालेल याबद्दल अजूनही संदिग्धता आहे. गेल्यावेळी झालेला स्फोट ३ आठवडे चालला होता. ज्वालामुखीमधून काळा आणि पांढरा धूर निघत आहे. तेथील आपत्ती व्यवस्थापन समितीने अजून भूकंपाचे झटके येण्याची ही शक्यता व्यक्त केली आहे. या सर्व गोष्टींमुळे मोठ्या इमारतींना धोका होऊ शकतो.

 

ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या व्हिडीओत ज्वालामुखीचा हा नजारा कैद झाला आहे. या व्हिडिओत कितीतरी किलोमीटरपर्यन्त धूर दिसत आहे. लाव्हारस स्विमिंगपूलमध्ये जातानाही या व्हिडीओत दिसत आहे. एका स्फोटाने पूर्ण परिसरातल्या पायाभूत सुविधा नष्ट करुन टाकल्या आहेत!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required