computer

श्रीलंकन गायिकेनं गायलेलं सिंहली भाषेतलं 'मानिके मागे हिथे' गाणं सॉलिड फेमस झालंय, तुम्ही अजून नाही ऐकलं?

आजपासून १० वर्षांपूर्वी एक गाणे वायरल झाले होते. 'व्हाय धिस कोलवरी डी' या गाण्याने इंटरनेट तुरळक असूनही तुफान धुमाकूळ घातला होता. आजही अनेकांना ते दिवस आठवले असतील. या गाण्याचा एकही शब्द कुणाला समजला नाही. पण तरीही हे गाणे लोकांनी डोक्यावर घेतले.

कोलावरी डी ची आठवण येण्याचे कारण म्हणजे सध्या असेच एक गाणे तुफान वायरल झाले आहे. "मानिके मगे हिथे" हे त्या गाण्याचे नाव. अनेकांच्या स्टेटसला किंवा यु ट्यूबवर तुम्ही हे गाणे ऐकले असेल. याचाही एकही शब्द कळत नसूनही या गाण्याने लोकांना वेडे केले आहे.

हे गाणे हिट करण्याचे श्रेय जाते ते श्रीलंकन गायिका योहानी डी सोल्वा हिला. पण हे गाणे तिचे नाही. सिंहली भाषेत हे गाणे सतीशन रत्नानायका यांनी ते म्हटले आहे. पण जेव्हा योहानीने ते गायले तेव्हा मात्र हे गाणे कुठच्या कुठे पोहचले.

रात्रीत वायरल सेन्सेशन झालेली योहानी श्रीलंकन गायिका आहे. कोलंबो येथे १९९४ साली तिचा जन्म झाला. योहानी टिकटॉकवर जास्त फेमस आहे. मानिके मगे फेमस व्हायच्या आधी तिच्या नावावर श्रीलंकेत एक विक्रम आहे. यु ट्यूबवर २४ लाख सबस्क्रायबर असणारी ती पहिली श्रीलंकन गायिका आहे.

मानिगे मगे गेल्यावर्षी जेव्हा गायले गेले तेव्हा ते विशेष चालले नाही. मात्र जेव्हा योहानीने ते गायले तेव्हा रात्रीत हे गाणे जगभर पसरले. आजवर हे गाणे १२ कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. कदाचित तिच्या आवाजासाठीच हे गाणे तयार झालेले असावे.

कशाची कधी कशी हवा होईल हे आजच्या रील्स आणि सोशल मिडियाच्या जमान्यात सांगता येत नाही. तुम्हीही जास्त विचार करु नका आणि गाण्याचा आनंद घ्या!!

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required