computer

वॉरेन बफेट सारखं श्रीमंत व्हायचं आहे? त्यांनीच समजावलेली यशाची गुरुकिल्ली समजावून घ्या

श्रीमंत व्हायला कोणाला आवडणार नाही? त्यातही ती श्रीमंती जर वॉरेन बफेट सारखी असेल त र? होय.. तुम्हीही श्रीमंत होऊ शकता..पण त्यासाठी तुम्हाला तुमचे जगणे वॉरेन बफेट सारखे जगायला हवे.त्यांची जीवनशैली आत्मसात करावी लागेल.वॉरेन बफेट हे आधुनिक मिडास आहेत हे कोणीही मान्य करेल. त्यांनी केलेल्या गुंतवणूकीचं सोनं झालेलं दिसतं.अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे इतरांपेक्षा वेगळे आहेत ? जगातील श्रीमंतांच्या अव्वल दर्जातल्या यादीतला हा माणूस कसे जगतो आपले दैनंदिन जीवन? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच त्यांच्या यशाची किल्ली त्यांनी स्वत: सांगितली आहे. काय आहेत या सीक्रेट टिप्स?... जाणून घ्यायचंय? चला तर जाणून घेऊ इथेच ,याच लेखामध्ये..

बर्कशायर हॅथवे चे कार्यकारी संचालक असलेले बफ्फे 'Oracle of Omaha ' म्हणून ओळखले जातात. अतिशय साधे आणि कटकसरीने जीवन जगणारे वॉरेन बफेट हे उदार आणि परोपकारी आहेत. त्यांचा आयुष्य जगण्याचा वेगळाच फंडा आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय हवे हेच तो फंडा सांगतो. त्यांनी अनेकदा अनेक कार्यक्रमातून, मुलाखतींमधून या टिप्स सांगितल्या आहेत.
त्यातील काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

१. तुम्हाला श्रीमंत व्हायचेय हे मनाशी पक्के ठरवा आणि त्यानुसार आपले पुढचे प्लान ठरवा.एवढेच नाही तर तुमचे ध्येय निश्चित करा,त्याचा पाठपुरावा करा. आपल्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींवर पैशांसाठी अवलंबून राहू नका.
 

२. लहान वयातच बचत करण्याची सवय लावून घ्या.ही बचत पुढे तुम्हाला एका मोठ्या रकमेच्या रूपात मिळू शकेल.वॉरेन बफेट जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या मित्राने पिनबॉल मशीन विकत घेवून ते एका सलून्मध्ये बसवले. त्यातून आलेल्या मिळकतीतून त्यांनी अजून काही मशीन्स खरेदी केली आणि काही दिवसानी $१२०० एवढ्या घसघाशीत फायद्यामध्ये विकून टाकली. तुम्हाला जर तुमचे भविष्य चांगले हवे असेल तर तुमच्या बिझनेस मध्ये सतत गुंतवणूक करत रहा. तुम्हाला त्याची चांगली फळे नक्कीच मिळतील पण सारी मिळकत एकाच ठिकाणी खर्च करू नका.

३. तुमच्या गरजा कमी करा तुमचे घर,कार, तुमचे ऑफिस, तुमचा फोन अशा गोष्टींवर आवश्यक असेल तेवढाच खर्च करा.वॉरेन बफेट हे अजूनही त्याच घरात राहतात जे त्यांनी १९५८ मध्ये खरेदी केले होते. ते जुन्या आणि रिफर्बीश केलेल्याच कार खरेदी करतात .बरेच दिवस नोकीयाचा फ्लॅपवाला जुना फोन ते वापरत,जो त्यांनी नुकताच बदलला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा पूर्ण उपयोग करून झाल्यावरच गरज असेल तर त्या वस्तू नवीन घ्या.तुमची मोठ्या प्रमाणात बचत होईल.

४.तुम्हाला वाटत असेल की श्रीमंत लोक महागडे अन्न जेवत असतील. किंवा स्वत:साठी आचारी नेमत असतील जो त्यांना हवे ते, हवे तेव्हा करून खायला घालत असेल. बरोबर? तर तुम्ही चुकीचा विचार करताय. तो श्रीमंत जर वॉरेन बफेट असेल तर तो नक्कीच साधे जेवण पसंत करेल. ते ही पैसे वाचवणारे फास्ट फूड !! वॉरेन बफेटआजही मॅक्डोनाल्डमधील जेवण घेतात. आजही तिथे मिळणारी कुपन्स वापरतात. तात्पर्य हे की जेवणावर तेवढेच पैसे खर्च करा जेवढे गरजेचे आहेत. तसेच त्यावर मिळणार्‍या सूट,सवलती,कुपन्स यांचाही पुरेपूर वापर करा आणि आपले पैसे वाचवा.

५. तुम्ही तुमचे कपडे किंवा छंद निवडतानाही बचतीचा विचार करा. कपडे महागडे वापरण्याऐवजी जे तुम्हाला शोभतील असे वापरा. केवळ ब्रँडनेम साठी कपडे खरेदी करण्यापेक्षा कपड्यांचा दर्जा पाहून कपडे खरेदी करा..जे स्वस्त पण टिकाऊ असतील. तुमच्या आवडी आणि छंद देखील असे असावेत ज्यातून तुमच्या वेळेची बचत होईल आणि तुम्हाला आनंद देखील मिळेल.

६. तुमच्या मित्रांना महागडी वस्तू भेट देण्यापेक्षा तुमचा वेळ आणि तुमचा सहवास भेट द्या. त्यांच्यासाठी वेळ काढा. महागड्या गिफ्ट्स मध्ये ते समाधान नाही जे तुम्ही त्यांच्या सोबत असण्यामध्ये आहे. ही एक प्रकारची भावनिक बचतच आहे.
 

७. जरी अपयश आले तरी तिथेच थांबू नका. त्याच मुद्द्यावर अडकू नका..पुढे चालत रहा. संधी अनेक मिळतात. एक संधी हातातून गेली तरी निराश न होता दुसर्‍या पर्यायाचा विचार करा.अपयश ही गोष्ट मनाला लावून न घेता तुमच्या स्वप्नांचा सतत विचार करा. बफ्फे सांगतात की जर हॉवर्ड विद्यापीठाने त्यांना रिजेक्ट केल्यावर ते थांबले असते आणि कोलंबिया विद्यापीठात बेंजामिन ग्राहम यांना भेटले नसते तर कदाचित आज ते इतके मोठे इन्वेस्टर झालेच नसते.

८ तुमच्या ध्येयाचा सतत पाठपुरावा करत रहा. जरी तुम्हाला सुरवातीला नकार मिळाला तरी तुमचे प्रयत्न सोडू नका.प्रयत्नांती परमेश्वर हे तर तुम्हाला माहितीच आहे. सततचे प्रयत्न तुम्हाला नक्कीच यश मिळवून देतील.

कोणतेही काम करताना तुम्ही स्वत: त्याचा पाठपुरावा करा. गरज पडली तर स्वत: त्या ठिकाणी जाऊन भेट द्या. बोला. प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचे महत्व जाणून घ्या,त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. प्रसंगी फोनकॉल किंवा ई-मेल पेक्षा तुमचे स्वत: जाऊन भेटणे फायद्याचे ठरते. मुख्यत: जेव्हा तुम्ही गुंतवणूक करणार असाल. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर एखादा विश्वासू भागीदार निवडणे कधीही फायद्याचेच ठरते.तो भागीदार तुम्हाला सतत चांगले काही करण्याचे आव्हान देत राहतो.

१०. पैशांची बचत करून आणि कर्जे टाळून तुम्ही व्यवसायाच्या अनेक संधी तयार करू शकता. इतकेच नाही तर तुमचे वैयक्तिक नियोजन देखील चांगल्या प्रकारे आखू शकता.उदाहरणार्थः आपल्या कामातून निवृत्त होणे. ही बचतीची सवय तुम्हाला खूप चांगली फळे देते. तुमची आयुष्यात जी काही ध्येयं आहेत ती पूर्ण करण्यासाठी साधी राहणी तुम्हाला मदत करते. तुमची संपत्ती आणि तुमची जीवनशैली यांची तुलना केलीत तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. खूप गोष्टी असतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाहीत. आयुष्याच्या एका वळणानंतर तुमची जीवनशैली आणि ती जगण्याची किंमत यांची बरोबरी होऊच शकत नाही.

११. बफ्फे यांनी दिलेली सर्वात महत्वाची टीप ही की, स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वत:शी कायम प्रामाणिक रहा. कुणाची नक्कलही करू नका. लोक तुम्हाला तुमच्या असण्याने ओळखतात. जर यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात आधी स्वत:मध्ये, स्वत: च्या व्यवसायमधे गुंतवणूक करा. Always pay first to yourself ..तुम्ही नक्कीच संपत्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. कधीच भावनेच्या भरात गुंतवणूक करू नका. कोणताही निर्णय कठोरपणे अमलात आणा. तुमच्या प्रयत्नांवर लक्ष असू दया.,जे तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत बनवतील..

मित्रांनो या होत्या या आधुनिक मिडास राजाने दिलेल्या काही सोन्यासारख्या टिप्स ..ज्या तुम्हाला नक्कीच श्रीमंतीच्या मार्गावर नेतील.
लेख आणि टिप्स कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required