computer

एअर बबल करार काय असतो? कोरोनाच्या संकटात एअर बबल करार कसा कामी येणार आहे?

कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे सध्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. २३ मार्च २०२० पासून भारतातील आंतरराष्ट्रीय एअर प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आला. पण नुकताच भारताने एअर बबल हा करार केला आहे. या द्वारे दोन देशातील पात्र प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतील.

शनिवारी श्रीलंकेबरोबर हा एअर बबल (Air Bubble) करार झाल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विट करत सांगितले, करारानुसार सार्क विभागातील सहा देश आणि इतर एकूण २८ देशांशी एअर बबल करार करण्यात आला आहे. एअर बबल म्हणजे एक द्विपक्षीय करार आहे ज्यात नियम आणि निर्बंध असतात. त्या अटी पाळून दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे होऊ शकतात.

यापूर्वी  भारताने फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेबरोबर एअर बबल करार केला आहे. एअर बबल ही दोन देशांमधील तात्पुरती व्यवस्था आहे. सध्या ज्या पद्धतीने संक्रमण वाढत आहे, त्यामुळे प्रत्येक देश आंतराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेऊन आहे. सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट्स, विक्री एजंट्स आणि ग्लोबल डिस्ट्रिब्युशन सिस्टमद्वारे तिकिटांची विक्री करण्याची परवानगी आहे. परंतु प्रवाशांना हेही पहावे लागेल की तो देश त्यांना प्रवेश करण्यास अनुमती देतो की नाही?

 

एअर बबल करार झालेले देश खालीलप्रमाणे आहेत.

अमेरिका

बहरीन

बांगलादेश

भूतान

कॅनडा

इथिओपिया

फ्रान्स

जर्मनी

इराक

जपान

केनिया

कुवैत

मालदीव

नेपाळ

नेदरलँड

नायजेरिया

ओमान

कतार

रशिया

रवांडा

सेशल्स

टांझानिया

युक्रेन

संयुक्त अरब अमिराती

युनायटेड किंगडम

उझबेकिस्तान

 

एअर मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की लवकरच ही सेवा सुरू होणार असून अटी व नियमात बसल्यास पात्र प्रवासी इतर देशांत विमान प्रवास करू शकतील.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required