९/११ च्या हल्ल्याला झाली २१ वर्षे!! यात वाचलेल्या लोकांचे अनुभव काय आहेत?

जगाने अनुभवलेला पहिला प्रचंड मोठा असा दहशतवादी हल्ला जर का कुठला असेल तर तो अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला प्रचंड मोठा हल्ला. थेट विमाने घुसवून केलेला हा हल्ला जगाला हादरवून सोडणारा होता. या घटनेचे पडसाद आज २१ वर्षांनी देखील उमटत असतात. या दहशतवादी हल्ल्यानंतर जग एका नव्या वाटेने प्रवास करू लागला. या हल्ल्यात तब्बल ३ हजार लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला होता. आज मात्र योगायोगाने या हल्ल्यातून बचावलेल्या काही लोकांची गोष्ट तुम्ही वाचणार आहात. देव तारी त्याला कोण मारी याचा पुरेपुर प्रत्यय त्यातून येतो. 

) होली विंटर 

होली विंटर आणि तिच्या दोन मैत्रिणींनी त्याच ट्विन टॉवर्समध्ये जाण्याचा प्लॅन आखला होता. त्यावेळी विंटर डेनव्हर नावाच्या शहरात राहत असे. न्यूयॉर्कमधील आपल्या आईला तिने सांगितले की मी तुला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला येणार आहे. पण तिच्या आईने मीच तुला भेटायला येते म्हणून सांगितले. तिने आपल्या आईला तू न येता मला न्यूयॉर्क येऊ दे म्हणून समजावले पण तिच्या आईने काही ऐकले नाही. आईमुळे विंटर घरीच राहिली. तिच्या दोन्ही मैत्रिणी मात्र ठरल्याप्रमाणे ट्विन टॉवर्समध्ये भेटल्या. सकाळीच विंटरने त्यांच्या सोबत बोलणे देखील केले आणि पुढे त्या दोघांचा या हल्ल्यात जीव गेला. विंटर मात्र अशा योगायोगाने जिवंत राहू शकली. 

२) ब्रेंडा ख्रिस्टेंसन 

ब्रेंडा कॅलिफोर्नियात राहत असे. तिचे दरवर्षी आठवडाभर ट्विन टॉवर्सचा मुक्काम हा ठरलेला असे. या मुक्कामात ती विविध पत्रकार, संपादक, यांच्यासोबत बोलत असे. पण नेमक्या २००१ साली तिने आपला सालाबादचा प्लॅन बदलला आणि ती एका सुट्टीवर निघून गेली. त्या ठिकाणी तिला जेव्हा यस दहशतवादी हल्ल्याची बातमी समजली तेव्हा मात्र तिला जबरदस्त धक्का बसला.

) जेम्स स्टेफुराक 

जेम्सची रोज एक फेरी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ठरलेली असे. तिथे जायचे कॉफी प्यावी, पेपर वाचावा फेरफटका मारावा आणि परत यावे असा त्यांचा दिनक्रम होता. त्यांचे काम स्टॉक्सचे असल्याने ९ वाजेला ऑफिसलाही जायचे असायचे. रोज ९ पर्यंत ट्रेड सेंटर फिरून ऑफिस गाठणारा हा माणूस त्यादिवशी चक्क साडेनऊ झाले तरी तयारी करत होता. एवढ्यात बातमी येऊ धडकली आणि तो हादरलाच. त्याच्या बिल्डिंगवरून वर्ल्ड ट्रेड सेंटरची बिल्डिंग दिसत असल्याने पाहतो तर काय समोर आगीच्या ज्वाळा उसळत होत्या. स्वतःच्या भाग्याचे आभार मानत तो आजही जगतो आहे. 

४) क्रिस्टल ब्रोवन 

क्रिस्टल क्लियर कम्युनिकेशन या कंपनीच्या सीईओ असलेल्या क्रिस्टल बाईंचा साखरपुडा झाला होता. त्यांचे भावी नवरदेव न्यूयॉर्कचे असल्याने त्यांनी देखील न्यूयॉर्क शिफ्ट व्हायचे ठरवले होते. मॉर्गन स्टॅनलीमध्ये त्यांना नोकरी मिळणार होती. त्यांचे ऑफिस हे ट्विन टॉवरमध्येच असणार होते. योगायोगाने त्यांना काही गोष्टी समजल्या ज्यामुळे त्यांनी लग्न मोडले. ज्यादिवशी ही घटना घडली त्यादिवशी त्या धक्क्यात होत्या. साखरपुडा मोडला म्हणून झालेले दुःख आता पळून गेले होते आणि काही गोष्टी घडणे योग्यच असते याचा त्यांना अनुभव येऊन गेला. 

) जॉर्ज केथ 

आपली नवी कोरी बीएमडब्ल्यू कार घेऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ७३ व्या मजल्यावर होणाऱ्या मिटिंगसाठी जॉर्ज निघाले होते. तितक्याच त्यांना गाडीत काही समस्या जाणवली. सकाळी ७ वाजताच ते शोरूमवर जाऊन धडकले. काम अवघ्या ३ मिनिटांचे होते. पण मेकॅनिकने ते काम ८ वाजण्याआधी करण्यास नकार दिला. शेवटी ८ वाजता गाडी घेऊन ते निघाले. ट्रॅफिकमध्ये अडकले असताना त्यांना आकाशात प्रचंड धूर दिसला. रेडिओवर बातमी सुरू झाली होती. त्यादिवशी त्यांनी सर्वात खाली उडणारे विमान देखील बघितले. एखाद्या सिनेमासारखा हा सिन होता. ते म्हणतात की, 'मी भाग्यशाली आहे, माझी गाडी खराब झाली. पण माझ्या ओळखीतले अनेक लोक मात्र वाचू शकले नाहीत.'

) ग्रीर एपस्टाईन 

ग्रीर या त्यावेळी मॉर्गन स्टॅनलीमध्ये कामाला होत्या. सकाळी ७ वाजता त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आल्या आणि इमेल वैगेरे चेक करून कॉफी पिण्यासाठी कॅफेटेरियात गेल्या. त्यावेळी त्यांना पुढची मिटिंग घेण्याआधी एक सिगरेट पिऊन येऊ म्हणून ठरवले. त्या लिफ्टने बाहेर पडत असताना एक कार आदळताना दिसली. त्या बाहेर पडल्यावर त्यांना धूर आणि लोक पळापळ करताना दिसले. त्यांना कित्येक लोक बिल्डिंगमध्ये अडकून पडल्याचे देखील दिसले. जेव्हा त्यांनी वर बिल्डिंगकडे बघितले तेव्हा त्यांना भलेमोठे भगदाड बिल्डिंगला पडलेले दिसले. हे बघत असताना अजून एक विमान जोरात आले आणि दुसऱ्याही बिल्डिंगमध्ये घुसले. त्यांनी धावतपळत स्वतःला सुरक्षित केले, मात्र एका सिगारेट ब्रेकने त्यांना वाचवले याबद्दल त्यांना आजही आनंद आहे.

) लॉरा सोरोकोफ 

लॉरा या आपल्या कामासाठी रोज वर्ल्ड ट्रेड सेंटरवरून जात असत. हल्ला झाला ९ सप्टेंबरला आणि ७ सप्टेंबर रोजी त्यांना कामावरून कमी करण्यात आले म्हणून त्यांचा तिथून जायचा विषय संपला. अशाप्रकारे नोकरी गेली, मात्र जीव वाचला असे लॉरा यांच्याबद्दल झाले.

वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जीव वाचलेल्या या लोकांच्या गोष्टी वाचल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. आपण काम करत राहावे आणि आनंदाने जगत राहावे. आपल्या आयुष्यात एखादी वाईट घटना ही आपल्याला मोठ्या वाईट घटनेतून वाचवणारी ठरू शकते. अर्थात हे प्रत्येकवेळेस जाणवेलच असेही नाही. शेवटी आयुष्य असेच असते म्हणून भरभरून जगून घ्यावे.

सबस्क्राईब करा

* indicates required