computer

राजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भूतानच्या नागरिकांनी काय केलं पाहा !!

भूतान देशाने आपल्या कृतीतून नेहमीच जगासमोर नवीन उदाहरण उभं केलं आहे. आता हेच पाहा ना. २१ फेब्रुवारी हा भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक याचा वाढदिवस. यावर्षी राजा खेसरने ४० व्या वयात पदार्पण केलं. भूतानच्या नागरिकांसाठी हा दिवस फारच महत्त्वाचा होता, पण त्यांनी मोठा महोत्सव आणि रोषणाई न करता हटके पद्धतीने आपल्या राजाचा वाढदिवस साजरा केला आहे.

भूतानचे पंतप्रधान लोटाय त्सेरिंग यांनी राजाच्या वाढदिवसानिमित्त आवाहन केलं की नागरिकांनी  या खास दिवशी भटक्या कुत्र्यांना आश्रय द्यावा आणि झाडे लावावीत. हीच राजासाठी मोठी भेट असेल. भूतानच्या नागरिकांनी या कल्पनेला लगेच उचलून धरलं. भूतानचे पत्रकार आणि वकील नामग्या झाम यांनी केलेलं ट्विट पाहा. त्यात ते सांगतात, की आम्ही ३ भटकी कुत्री दत्तक घेतली आहेत.

या दिवसाचं निमित्त साधून पंतप्रधान लोटाय त्सेरिंग यांनी आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या धोरणांची घोषणा केली. येत्या वर्षभरात या धोरणांवर काम केलं जाईल.

भूतानच्या लोकांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या निसर्ग प्रेमाचं आणि भूतदयेचं उदाहरण दिलं आहे. राजा आणि राणीच्या पोटी मुलाचा जन्म झाल्यानंतर मुलाच्या स्वागतासाठी हिमालयाच्या कुशीत तब्बल १,०८,००० झाडे लावण्यात आली होती.

तर, आपल्याकडेही अशाच कल्पनेची आता आवश्यकता आहे. तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required