रेल्वेच्या डब्यावर हे नंबर का असतात भाऊ ? काय आहे या मागील लॉजिक ?

आपण अनेकदा रेल्वेने प्रवास करतो, पण तुम्ही कधी रेल्वेच्या डब्यावर असलेल्या ४ ते ६ डिजीटच्या नंबरकडे बघितलं आहे का ? बघितलं असेल तर तुम्ही सांगू शकता का हे नंबर कश्यासाठी असतात ? कदाचित तुम्हाला माहित नसेल. चला आज आम्हीच सांगतो या नंबर मध्ये कोणती माहिती लपलेली असते ते.

नंबरच्या आतील माहिती

स्रोत

रेल्वे कोचवर ४, ५ किंवा ६ अंकांचा नंबर लिहिलेला असतो. या नंबरच्या सुरुवातीचे २ नंबर हे त्या कोचच्या निर्मितीचे वर्ष दर्शवतात. उदाहरणार्थ ०८४५२ असा नंबर असलेला कोच २००८ साली तयार करण्यात आलेला आहे, तसेच ०४०५२ क्रमांकाचा अर्थ होतो हा कोच २००४ साली तयार करण्यात आला आहे. पण या पद्धतीचा वापर सर्वच ट्रेनच्या डब्यांसाठी होत नाही. खास करून राजधानी एक्स्प्रेससाठी. राजधानी एक्स्प्रेसवर 2951/2 या प्रकारचा क्रमांक असतो.

स्रोत

काहीवेळा या दोन डिजीटचा अर्थ कोच ला जेव्हा नव्याने बनवण्यात आलं ते वर्ष दाखवतात तर कधीकधी हा कोच जेव्हा रेल्वे मध्ये सामील करून घेण्यात आला ते वर्ष दाखवतात. हे रेल्वे नुसार बदलत राहतं.

चला तर आता जाणून घेऊ बाकीच्या क्रमांकामागील कारण !!

सुरुवातीचे २ डिजीट वर्ष दाखवतात तर त्या पुढील संख्या ती रेल्वे कोणत्या प्रकारची (एसी, स्लीपर इत्यादी) आहे हे दर्शवतात. याबद्दल आणखी जाणून घेऊया :

001-025: एसी प्रथम श्रेणी (AC first class) एनईआर (NER)

026-050: संपूर्ण 1 एसी + एसी -2 टी (Composite 1AC + AC-2T)

051-100: एसी - 2 टी (AC-2T) म्हणजे 2 टियर एसी कोच

101-150: एसी -3 टी (AC-3T) म्हणजे 3 टियर एसी

151-200: सीसी (एसी चेयर कार) CC (AC Chair Car)

201-400: एसएल (दुसर्या श्रेणीतील स्लीपर) SL (2nd class sleeper)

401-600: जीएस (सामान्य दुसरी श्रेणी) GS (General 2nd class)

601-700: 2 एस (दुसऱ्या श्रेणीतील सिटींग / जनशताब्दी चेयर कार) 2S (2nd class sitting/Jan Shatabdi chair cars)

701-800: एसएलआर SLR (Seating cum Luggage Rake)

801+: पँट्री कार, वीपीयू, आरएमएस मेल कोच, जनरेटर कार, इत्यादी.

स्रोत

या नंबरच्या बाजूला WCR, NF, SR अश्या प्रकारची अक्षरं सुद्धा लिहिलेली असतात. त्यांचा अर्थ खालील प्रमाणे :

WCR – पश्चिम मध्य रेल्वे (वेस्टर्न सेन्ट्रल रेल्वे)

EF – पूर्व रेल्वे (इस्टर्न रेल्वे)

NF – उत्तरपूर्व सीमा भाग (नॉर्थइस्टर्न फ्रन्टियर)

SR – दक्षिण रेल्वे (साउथ रेल्वे)

 

आता पुढच्यावेळी जेव्हा रेल्वेने प्रवास कराल तेव्हा तुमचा कोच कधी तयार झाला आहे आणि तो तुमच्या ट्रेन बद्दल काय सांगतो ते नक्की तपासा.

सबस्क्राईब करा

* indicates required