computer

तुमच्या व्हॉट्सऍपची खाजगी माहिती वापरून फेसबुक जाहिराती दाखवणार? व्हॉट्सऍपचे नवीन नियम काय आहेत?

व्हॉट्सऍप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेंजर अँप आहे हे तुम्ही सर्वजण जाणताच. अनेकांच्या आयुष्यातील व्हॉट्सऍप आता एक अविभाज्य घटक बनला आहे. सध्या जगातील २०० कोटींहून अधिक ग्राहक व्हॉट्सऍपचा नियमित वापर करतात.

सध्या नवीन अटी मान्य करण्यासाठी व्हॉट्सऍपवर एक पॉपअप येत आहे. तुम्हीही तो पाहिला असेल. त्यात तुम्हाला दोन पर्याय दिसतात मान्य किंवा अमान्य. या अटी किंवा नियम तुम्ही मान्य करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचल्या आहेत का? वाचल्या असतील तर नेमका याचा अर्थ काय आहे. याची नेमकी माहिती आज या लेखात घेऊयात.

नवीन धोरणानुसार या नवीन अटी आणि शर्ती युजरला मान्यच कराव्या लागणार आहेत. हे धोरण ८ फेब्रुवारी पासून लागू होणार आहे. ज्यांना मान्य नाही त्यांना व्हॉट्सऍपचा वापर करता येणार नाही. त्यासाठी व्हॉट्सऍपच्या हेल्प सेंटरची मदत घेता येईल. ज्यांनी नव्या अटींना मान्यता दिली आहे याचा अर्थ व्हॉट्सऍप ग्राहकांचा डेटा वापरू शकणार आहेत. व्हॉट्सऍपची पेरेंट कंपनी फेसबुक आणि इंस्टाग्राम व्हॉट्सऍपमधून मिळणारा ग्राहकांचा डेटा वापरू शकतात. यामुळे व्हॉट्सऍपची कमाईही होणार आहे.

यामुळे यूजर प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. म्हणजे समजा तुम्ही स्टेट्सवर नवीन कार घेतल्याचे फोटो टाकले तर व्हॉट्सऍपला कळेल आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर त्याविषयी जाहिराती किंवा माहितीही येऊ शकेल.

फेसबुकवर ज्या जाहिराती दिसतील त्या व्हॉट्सऍपवर असलेल्या कंटेंटशी मिळत्याजुळत्या असतील.

तसेच  व्हॉट्सऍप वापर करताना यूजरने लोकेशन ऑन ठेवल्यास तो कुठे आहे हेही समजेल, म्हणजे समजा यूजर महागड्या माँलमध्ये किंवा दुकानात खरेदी करत असल्यास त्याच्या निवडीनुसार फेसबुकवर प्रोडक्टच्या जाहिराती दिसतील. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून यूजर कोणाला कॉल करतो किंवा व्हिडीओ कॉल करतो यावरही नजर राहणार आहे.

एक चांगली गोष्ट म्हणजे पर्सनल चॅटचा यामध्ये समावेश नसेल. म्हणजे सर्व वैयक्तिक मेसेंजिंग तुमच्याखेरीज कोणालाही वाचता येणार नाही. end-to-end encryption नुसार व्यक्तीगत मसेज सुरक्षित असतील. याचा वापर कंपनी करू शकणार नाही.

सध्या फक्त युरोपिअन युजर्स फेसबुकवर माहिती (डेटा) शेयरिंग बंद ठेऊ शकतात. पण बाकीच्या देशांत हा पर्याय उपलब्ध नाही. व्हाट्सउपच्या या अटींमुळेच सध्या अनेक जण सिग्नल, टेलिग्राम या मेसेंजर अँपकडेही वळत आहेत.

तर, आता कोणतीही माहिती शेयर करताना सावध रहा. नवीन अटी मान्य करताना एकदा नक्की वाचून घ्या. तुम्हाला याबद्दल  काय वाटतं हे आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required