computer

एकाचवेळी ८ जणांशी बोला....व्हॉटसॲपचं नवीन फिचर कसं वापरायचं ते शिकून घ्या !!

गेल्या महिनाभरापासून आपण सगळेच सोशल डिस्टिंग म्हणजे अलगीकरण पाळत आहोत. या लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना साधा फोन कुणी करतच नाहीय, सरळ उचलला फोन की लावला व्हिडिओ कॉल अशी काहीशी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात भेटता न येण्याच्या या काळात आपल्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी संपर्कात राहण्यासाठी कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलच्या पर्यायाने मोठीच मदत झाली आहे. आणि आता व्हॉटसॲपच्या नव्या अपडेटमुळे आता व्हिडिओ कॉल आणि व्हॉइस कॉल करणं आणखी सोप्पं होणार आहे. 

या नव्या अपडेटमुळे आता तुम्हाला एकाचवेळी तब्बल ८ जणांशी व्हिडिओ चॅट किंवा फोन कॉल करता येणार आहे. हे कसं शक्य आहे ते आजच्या लेखात जाणून घेऊया.
पुढे वाचण्याआधी एक महत्त्वाची बाब समजून घ्या. हे फिचर पुढच्या आठवड्यापर्यंत उपलब्ध होणार आहे. याखेरीज केवळ अँड्रॉईडच्या ४.१ आणि पुढच्या व्हर्जन्सवरच वापरता येणार आहे. जर तुमच्या फोनमध्ये अँड्रॉईडचं जुनं व्हर्जन असेल तर तुम्हाला हे फिचर वापरता येणार नाही.

आता कॉलिंगची प्रक्रिया समजून घेऊया.

या फिचरसाठी तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं असणं गरजेचं आहे. जर नेटवर्क व्यवस्थित नसेल तर अडचणी येऊ शकतात. आता प्रक्रिया बघू.

ग्रुप कॉलिंग

जर तुम्हाला तुमच्या व्हॉटसॲप ग्रुपमधल्या मित्रांना व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल करायचा असेल, तर ग्रुपच्या उजव्या बाजूला असलेल्या व्हिडिओ कॉलच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या ८ मित्रांशी बोलायचं आहे त्यांची निवड करा. निवड केल्यानंतर व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलच्या पर्यायावर क्लिक करा.

वैयक्तिक कॉलिंग

१. ज्या मित्राला व्हॉइस/व्हिडिओ कॉल करायचा आहे त्या मित्राच्या चॅट विंडोमध्ये जा.
२. उजव्या बाजूला असलेल्या व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉलच्या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमच्या मित्राने कॉलचं उत्तर दिल्यानंतर  "Add Participant" पर्याय निवडून आणखी मित्रांना सामील करून घ्या. अशाप्रकारे तुम्ही ८ जणांशी एकाचवेळी बोलू शकता.

तर मंडळी, आज संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. अशावेळी व्हॉटसॲपचं नवीन फिचर सगळ्यांच्याच कामी येईल. तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required