computer

काय म्हणता, व्हाट्सअपवर लास्ट सीन दिसत नाही? हे आहे कारण.

आज सकाळपासून व्हॉटसॲपच्या 'लास्ट सीन'वर लोक बोलत आहेत. तुम्हाला माहित आहे का हा काय प्रकार आहे? काल तुमच्या मित्र मैत्रिणींचे लास्ट सीन दिसत होते का? थोडं आठवून पाहा. दिसत नसतील तर घाबरू नका. ही समस्या जगभरातल्या लोकांना येत आहे.

काल रात्रीपासून अनेकांनी मित्रांचे लास्ट सीन दिसत नसल्याने व्हॉटसॲपकडे तक्रार केली होती. व्हॉटसॲपने यावर अधिकृतपणे काही म्हटलेलं नाही, पण या मागची कारणं आता समोर येत आहेत. 

असं म्हणतात की व्हॉटसॲपमध्ये एक 'बग' (Bug) आहे. हा बग युझर्सना लास्ट सीन बघण्यापासून रोखत आहे. व्हॉटसॲपमध्ये लास्ट सीन हा प्रकार प्रायव्हेसी सेटिंगच्या अंतर्गत येतो. या बगमुळे प्रायव्हेसी सेटिंगमध्ये बदल केल्यानंतरही लास्ट सीन दिसत नाहीय. ही समस्या कधी पासून येत आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.  

ही समस्या बघता अनेकांनी आपले व्हॉटसॲप ॲप अनइंस्टॉल केले आहेत. व्हॉटसॲपबद्दल बातमी देणाऱ्या WABetaInfo ने म्हटलंय की ज्यांनी ॲप अनइंस्टॉल केले आहेत त्यांना पुन्हा लॉगइन करता येणार नाही. त्यामुळे जर तुमच्या मित्रांचे लास्ट सीन दिसत नसतील तर घाबरून जाऊन व्हॉटसॲप अनइंस्टॉल करू नका.

आता या सगळ्या भानगडीवर व्हॉटसॲपचं काय म्हणणं आहे हे पाहण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required