computer

कोरोनापेक्षाही जास्त वेगाने पसरणारा 'बिनोद' नक्की आहे तरी काय? बिनोदची भानगड जाणून घ्या !!

भारतात गेल्या काही वर्षात रोस्ट नावाची गोष्ट चांगलीच गाजत आहे. रोस्ट म्हणजे एखाद्याला टार्गेट करून त्याची थट्टा करणे!! काही दिवसांपूर्वी कॅरीमिनाटी प्रसिध्द झाला होता. तोही असेच व्हिडीओ बनवत असतो. त्याचा एक रोस्ट व्हिडीओ जबरदस्त प्रसिद्ध झाला होता हे तर सगळेच जाणतात.

Slayy point नावाचा  एक यु ट्यूब चॅनेल आहे. त्यांनी एक व्हिडिओ बनविला "why indian comment section is garbage". म्हणजे भारतीय कॉमेंट५बॉक्स उघडून बघितले की तिथे कसा कचरा भरलेला असतो. 

कोणीही उठतो आणि काहीही कॉमेंट करतो. हा अनुभव तुम्ही पण घेतला असेलच. अनेकजण विषय काय असतो आणि कॉमेंट काय करतात हे ही पाहात नाहीत. तर या व्हिडिओत अशीच एक कॉमेंट दाखवली. कमेंट करणाऱ्याचे नाव होते बिनोद थरू. तर त्याने काय कॉमेंट केली असेल? तर फक्त स्वतःचे नाव- बिनोद- कमेंटमध्ये टाकले. 

हे कमी की काय म्हणून ७ लोकांनी ती कमेंट लाईक देखील केली. त्यांनी पुढे त्या बिनोदची यथेच्छ धुलाई केली की बस्स! 

झालं!  लोकांनी पण मग बिनोदची खेचायला सुरूवात केली. हळूहळू यु ट्युब, फेसबुक, ट्विटरवर पण बिनोद ट्रेंड व्हायला लागला. मिम्स बनविणारे पण मग मैदानात उतरले आणि बिनोद देशभर प्रसिद्ध झाला.

लोकांच्या क्रिएटिव्हिटीला उधाण आले आहे. एकाने तर कोरोनासुद्धा एवढ्या जोरात पसरत नाही तेवढा बिनोद पसरला असे म्हटले आहे. पेटीएमने सुद्धा आपले ट्विटरवरील नाव बदलून बिनोद असे केले आहे.

एकमात्र नक्की, की सध्या काय प्रसिद्ध होईल याचा नेम राहिला नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required