प्रजासत्ताक दिन म्हणून '२६ जानेवारी, १९५०' या तारखेची निवड का झाली ? माहित आहे का ?

२६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारतीय संविधान अंमलात आले. ब्रिटिश सरकार विरुद्ध चाललेल्या प्रदीर्घ लढाई नंतर भारताने स्वतंत्र होऊन स्वतःला एक लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित केलं. पण आजच्या दिवशी एक प्रश्न पडतोच : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळूनही २६ जानेवारी १९५० ही तारीख दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का निवडला ?

आता कोणालाही वाटेल की संविधान स्वीकारण्यासाठी सरकार कोणताही दिवस निवडू शकते, त्यात विशेष काय ? पण राव २६ जानेवारी मागे सुद्धा एक लपलेला इतिहास आहे. चला तर आज जाणून घेऊया.

डिसेंबर १९२८ साली भारतीय कॉंग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला. या ठरावा मध्ये नमूद केल्याप्रमाणे ब्रिटीश सरकारला एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. पण ब्रिटिशांनी यावर आपलं उत्तर देताना म्हटलं की, ‘भारत एक सार्वभौम राष्ट्र होण्यासाठी सशक्त नाही’. अर्थात ब्रिटिशांना भारतातली सत्ता एवढ्या सहजा सहजी सोडायची नव्हती.

२६ जानेवारी, १९३० - संपूर्ण स्वराजची घोषणा (स्रोत)

भारतीय कॉंग्रेसने यावर आपलं उत्तर म्हणून वर्षभरा नंतर म्हणजे २६ जानेवारी १९३० साली लाहोर येथे जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भारताच्या स्वातंत्र्याची (संपूर्ण स्वराजची) घोषणा केली आणि रावी नदीच्या काठी तिरंगा फडकवला.

पुढे १७ वर्षांनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपण स्वतंत्र झालो. याच दिवसापासून स्वतंत्र भारताचं संविधान तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलं आणि ३ वर्षांनी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे काम पूर्ण होऊन आपल्याला संविधान मिळालं.

...पण २६ नोव्हेंबर रोजी प्रजासत्ताक दिन साजरा न करता २६ जानेवारी, १९३० सालची आठवण म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारण्यात आले.

तर हा आहे आपल्या प्रजासत्ताक दिना मागचा इतिहास !!

सबस्क्राईब करा

* indicates required