computer

एकेकाळी 'एप्रिल फुल' एखाद्या सणासारखा का साजरा केला जायचा !!

नुकताच एप्रिल फुल बनवण्याचा दिवस येऊन गेला.हा दिवस एकेकाळी वर्षातील सर्वात सावधान राहण्याचा दिवस!! एकेकाळी म्हणण्याचे कारण असे की नव्या पिढीला या 'प्रँक डे' चे काही पदले नाही.खोडसाळ उद्योग आता वर्षभर केले जातात.तरीपण 'अधिकृत' हे स्टेटस मिळवलेल्या या दिवशी  कोण येऊन आपल्याला मूर्खात काढून जाईल सांगता येत नाही. आजच्या दिवसाला अधिकृतपणे तसा हक्क देण्यात आला आहे. म्हणून कोणाला राग येण्याचा पण विषय नाही. एप्रिल फुल बनविण्यासाठी लोक आजच्या दिवशी भन्नाट डोक्यालिटी वापरताना दिसतात. पण हा दिवस असा का साजरा केला जातो हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चला तर आज यामागील कारण पण समजून घेऊया...

एक काळ होता, जेव्हा रोमन लोक आपले नववर्ष एक एप्रिलपासून सुरू करायचे. तर मध्य युरोपियन्स नववर्ष २५ मार्चपासून सुरू करत होते. १५८२ साली मात्र पोप ग्रेगोरी १३ यांनी नवे निर्देश देत नवीन वर्ष १ जानेवारीपासून साजरा करण्यास सांगितले. यालाच ग्रेगोरियन कॅलेंडर असे म्हटले जात असते. 

आता कुठलीही नवी प्रथा काय सर्वच स्वीकारत नाहीत, याबाबत पण असेच झाले. काही नवे वर्ष १ जानेवारीला साजरे करू लागले तर काहींनी याला काय मान्यता दिली नाही. आपले एक एप्रिललाच नवे वर्ष बरे हे त्यांचा म्हणणे पडले. आपण करत असलेली गोष्ट दुसऱ्यांनी केली नाही तर त्याला चिडवणे ही गोष्ट पण साहजिक असते.

एक जानेवारीला नवे वर्ष साजरे करणारे मग एक एप्रिलवाल्यांचा मजाक उडवू लागले. एवढेच नाहीतर आज जसे आपण एकमेकांना आजच्या दिवशी मूर्खात काढतो तसे ते पण काढू लागले. मात्र या लोकांना तेव्हा आयडिया नव्हती की ही गोष्ट पुढे जाऊन प्रथा होऊन जाईल.

आपल्या बॉलीवूडमध्ये तर एकेकाळी हे गाणे सुपरहीट झाले होते.

ऐप्रिल फूल बनाया
तो उनको गुस्सा आया
तो मेरा क्या कुसूर
ज़माने का कुसूर
जिसने दस्तूर बनाया

पूर्ण युरोपात मग एक एप्रिल आला की एकमेकांना फुल बनविण्याची प्रथा सुरू झाली. हळूहळू ती प्रथा इतर जगात पण पसरली आणि आता तर बिनधास्तपणे सर्वच लोक एकमेकांना एप्रिल फुल बनविताना दिसतात. अशाप्रकारे एक एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून साजरा केला जाऊ लागला.

तर मित्रांनो आजच्या दिवशी मित्रांना किंवा जवळच्या लोकांना एप्रिल फुल बनविताना हलकासा मजाक करून भागवून घ्या, कारण अति आगाऊपणा एखाद्याला मोठा त्रास देऊ शकतो.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required