computer

नेहमीचं बाथरूम नाही, हे आहे स्त्रियांसाठीचं खास प्रसाधनगृह!! ठाण्यातल्या WOLOO बद्दल जाणून घ्या!!

आपल्याकडे काही वर्षांपासून सार्वजनिक शौचालयांमध्ये वाढ झाली आहे, पण स्वच्छतेच्या बाबतीत अजून पण आपण मागेच आहोत. पब्लिक टॉयलेटमधला वास, तिथली अस्वच्छता टाळण्यासाठी अनेकजण कमी पाणी पितात जेणेकरून शौचास जावं लागू नये. खास करून महिलांना ही समस्या त्रासदायक ठरते. ठाण्यात सुरु झालेल्या नवीन प्रयोगामुळे कदाचित हे चित्र बदलेल.

महिलांच्या समस्या ओळखून ‘लूम्स ॲण्ड व्हिवर रिटेल्स प्रा.लि’ या संस्थेने ‘लू-‘वुमन्स पावडर रूम’ नावाचा नवीन प्रयोग हाती घेतला आहे. या संस्थेच्या शिवकला मुदलियार आणि मनीषा केळशीकर यांनी मिळून ठाण्यात WOLOO   (Woman's Loo) सुरु केलं आहे. तसं बघायला हे महिलांसाठीचं सार्वजनिक प्रसाधन गृह आहे, पण इथे स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व देण्यात आलंय.

सुरक्षेसाठी प्रसाधन गृहच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. आतलं वातावरण नेहमीच्या शौचालायापेक्षा एकदम वेगळं आहे. शौचालयाशिवाय आत एक छोटं कॅफे आहे. तिथे  थोडावेळ बसून मस्त कॉफी किंवा चहा घेता येतो. शिवाय दुकान पण आहे. या दुकानात महिलांसाठीची उत्पादनं ठेवण्यात आली आहेत. गरज पडल्यास शिलाईसाठी कीट ठेवण्यात आलंय. ज्या महिलांसोबत लहान मुल असेल त्यांच्यासाठी खास डायपर बदलण्याची जागा, तसेच स्तनपान कक्ष ठेवण्यात आलंय.

१९ नोव्हेंबर पासून WOLOO  महिलांसाठी खुलं झालं आहे. WOLOO ची स्थापना ठाण्यातच का झाली? तर याला उत्तर म्हणजे ठाणे हे हार्बर आणि सेन्ट्रल रेल्वे मार्गांना जोडणारं ठिकाण आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या जागी पाहिलं WOLOO  सुरु करण्यात आलंय.

प्रत्येकी २० रुपये फी देऊन महिलांना WOLOO  वापरता येऊ शकतं. रोज प्रवास करणाऱ्यांसाठी दर महा ४९९ रुपये दराने सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या बदल्यात मोफत चहा, कॉफी, पाणी, सॅनिटरी नॅपकीन दिलं जातं.

तर महिला वाचकांनो, लवकरच मुंबईच्या जवळजवळ १० भागांमध्ये WOLOO  सुरु होणार आहे, पण जर तुम्ही ठाण्यात आलात तर एकदा WOLOO  ला नक्की भेट द्या. तुमचा अनुभव  आमच्या सोबत नक्की शेअर करा.

 

पत्ता : शॉप नं. ९, परांजपे उद्योग भवन, गोखले रोड, पोस्ट ऑफिसच्या समोर, आंबेडकर पुतळ्याजवळ, ठाणे स्टेशन परिसर.

सबस्क्राईब करा

* indicates required