computer

व्हिडीओ ऑफ दि डे : या स्त्रीने पुरातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या जवानाचे पाय धरले !!

मागच्या अनेक वर्षात आला नव्हता असा पूर कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात आला आणि त्याने थैमान घातलं. यापैकी सांगलीला पुराचा सर्वात जास्त फटका बसलाय. सध्याच्या आकडेवारीनुसार तिन्ही जिल्ह्यातून तब्बल २.८५ लाख लोकांना वाचवण्यात आलं आहे. दुर्दैवाने २४० लोकांना जीव गमवावा लागलाय.
 

चांगली गोष्ट अशी की महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ येतोय. अगदी गहूडाळींपासून ते कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स, औषधं अशा सर्वप्रकारची मदत केली जात आहे. हा मदतीचा ओघ येण्यापूर्वीपासून आपल्या भारताचे खरे हिरो, भारतीय सैन्य, नौदल या भागात राबत आहेत. बोटीतून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोचवत आहेत. बोटीत चढणाऱ्य पूरग्रस्तांचे हाल तर काय सांगावेत? घर-जनावरे तसेच सोडून फक्त अंगावरचे दागिने आणि एका पिशवीत काही महत्त्वाचे सामान इतकंच घेऊन हे लोक बोटीत चढत आहेत आणि आपले जवान अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत  दिवसरात्र माणसांना वाचवण्याचं काम करत आहेत. हे काम एवढ्या लवकर संपेल असं वाटत नाही.

नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पुरातून सुखरूप बचावलेली एक स्त्री जवानांच्या पाया पडताना दिसत आहे. हा पाहा तो व्हिडीओ.

मंडळी, सगळीकडे पुराचं पाणी शिरलेलं असताना वाचवायला आलेला जवान कोणत्याही देवापेक्षा कमी नसतो. त्या स्त्रीने याच भावनेने जवानांच्या पायांना स्पर्श केलाय. 

मंडळी, पूर ओसरत असला तरी तिथली परिस्थिती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही मदत करू शकता.

ई-मेल - [email protected]
Name - Smita Kaustubh Khandekar
Account - 080110100003316
Bank - TJSB Sahakari Bank Ltd, Kolhapur Branch
IFSC - TJSB0000080 (five times zero, eight zero)
Contact - 9421154055 / 9673614398

 

आपण आता मदत करू शकतोच, पण खरी गरज अजून आठवड्याभराने लागेल. तोपर्यंत सगळीकडे नीट संपर्क होईल आणि नक्की कुठे काय आणि किती गरज आहे याचा अंदाज येईल. लोकांची घरे वसवण्यासाठी इलेक्ट्रिक सामानापासून कपडे-चटया या सगळ्यांची तेव्हा गरज असेल.