computer

रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या बाईंना त्यांच्या कलेने कुठे नेले पाहा!!

लतादीदींचे गाणे आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. त्यांची गाणी थेट मनाला भिडणारी असतात.  ही लतादीदींच्या आवाजात जादू आहे आणि म्हणूनच तर एवढे वर्ष झाले तरी आजही त्यांचा करिष्मा टिकून आहे. 

मंडळी, काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनवर बसून लतादीदींचे प्रसिद्ध 'एक प्यार का नगमा है' गाणे म्हणणाऱ्या एका बाईचा एक विडिओ आला. तो विडिओ भयाण वायरल झाला राव!! त्या बाईच्या आवाजाचे लाखो लोक फॅन झाले. अस्सल सोनं लगेच लखलखतं, हो ना?

आता पुन्हा ती महिला चर्चेत आली आहे. पण आता तुम्ही तिला ओळखणार नाही एवढा बदल तिच्यात झाला आहे. बंगाल येथे राणाघाट स्टेशन आहे. तिथे ही महिला काम करायची. या महिलेचे नाव राणू असल्याचे सांगण्यात येत आहे. मंडळी, रेल्वेत काम करणारी बाई एखाद्या प्रशिक्षित गायकासारखी गाणे म्हणते म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटणार होतेच. साहजिक तेच झाले पण तिच्या आवाजातील जादू बघून सगळ्यांनी तिचे कौतुक केले. 'बारपेटा टाऊन द प्लेस ऑफ पीस' नावाच्या एका पेजवर हे गाणे शेयर करण्यात आले होते.  या विडिओला तब्बल 40 लाख लोकांनी पाहिले आहे. 

नवऱ्याच्या मृत्यूनंतर राणू रेल्वे स्टेशनवर काम करून आपले घर चालवत होती. तिथेच ती गाणे पण म्हणत असे आणि गाणे ऐकून प्रवासी तिला पैसे देत असत. मंडळी, तिचा फक्त लतादिदींचे गाणे म्हणतानाचा विडिओ वायरल झाला असला तरी ती अनेक गायिकांची गाणी म्हणत असते. 

पण एक गाणे वायरल झाले आणि बाईचे नशीब बदलले राव!! आता राणूला चक्क एका सिनींग शोमध्ये बोलवण्यात आले आहे आणि म्हणूनच तिचा हा मेकओव्हर करण्यात आलाय. त्यांचा सगळा खर्च शोचे स्पॉन्सर करणार आहेत. सद्या पुन्हा वायरल झाल्यावर एका पिंक आणि सिल्वर कलरच्या साडीत ती दिसत आहे. या लुकमध्ये राणूला घरच्यांनीसुद्धा ओळखले नाही म्हणे.  

कलेला मरण नाही असे म्हटले जाते ते राणूच्या रूपाने पुन्हा सिद्ध झाले आहे.

 

लेखक : वैभव पाटील