computer

या दोघांची जोडी तुम्हाला संकटावर मात करायला नवीन उर्जा देईल !!

तो अंध आहे आणि तिला चालता येत नाही. अशा अवस्थेत कोणी हायकिंगचा विचार तरी करेल का ? पण त्या दोघांनी हा विचार केला आणि ते निघाले.

मंडळी, कॉलराडो भागातली मेलीनिया क्नेच (२९ वर्ष) हिला जन्मतःच ‘स्पिना बफिडा’ आजार आहे, त्यामुळे तिला चालता येत नाही. ती दैनंदिन आयुष्यात व्हीलचेअरवर अवलंबून आहे.

दुसऱ्या बाजूला ‘त्रेव्होर हान’ (४२ वर्ष) याला ग्लुकोमा आजारामुळे ५ वर्षापूर्वी डोळे गमवावे होते. त्याला हायकिंगची फार पूर्वीपासून आवड होती. आंधळेपणा आल्यानंतरही त्याने हायकिंग सोडलं नाही, पण त्याला इतर हायकर्सवर अवलंबून राहावं लागत असे. तो इतरांच्या मार्गदर्शनावर प्रवास करायचा.

दोघेही एका व्यायाम प्रशिक्षणाच्यावेळी भेटले. लवकरच त्यांच्यात मैत्री झाली. दोघांमधला समान धागा  म्हणजे भटकंतीचं प्रचंड वेड आणि शारीरिक कमतरता, पण शोधला तर उपाय हा असतोच. त्यांनी एकत्र यायचं ठरवलं

मेलीनिया म्हणते की “आमचं एकत्र येणं म्हणजे केवळ कॉमन सेन्सचा भाग होता”...

मेलीनियाला आता त्रेव्होरच्या रूपाने पाय मिळाले आहेत आणि त्रेव्होरला मेलीनियाच्या रूपाने डोळे. त्रेव्होरच्या खांद्यावर एक कॅरियर असतं. त्यात तो मेलीनियाला बसवतो. मेलीनिया त्याला दिशा दाखवते.

त्यांनी आजवर बराच प्रवास केलाय. जिथे धडधाकट जाऊ शकत नाही तिथे दोघेही सहज जाऊन आलेत. त्यांच्या प्रवासाचे हे फोटो पाहा.

सबस्क्राईब करा

* indicates required