या नाण्याला जगातलं सर्वात महागडं नाणं का म्हणतात? या नाण्याचा इतिहास काय सांगतो पाहा !!

एखाद्या नाण्याची किंमत किती असू शकते? अर्थात याचं नक्की उत्तर देता येणार नाही. पण नाणं जितकं जुनं आणि दुर्मिळ, तितकी त्याची किंमत अधिक हे गणित तर माहित आहे. संग्राहक आणि हौशी लोकच या प्रश्नाचं नेमकं उत्तर देऊ शकतात. आज आम्ही एका नाण्याबद्दल सांगणार आहोत, या नाण्याची किंमत चक्क १ कोटी रुपये आहे.
जगातलं सर्वात महाग नाणं अशी या नाण्याची ओळख आहे. आता हे नाणे विकले जाणार आहे. काही दिवसांतच त्यांचा लिलाव होईल. साहजिकच यावेळी त्याची किंमत १ कोटीपेक्षा जास्त असेल. अमेरिकेतल्या लास वेगास इथं हे नाणं विक्रीस ठेवण्यात येणार आहे.
हे नाणं १७९४ सालचं आहे. अमेरिका स्वतंत्र झाली त्यानंतर काढले गेलेले पहिले नाणे अशी या नाण्याची ओळख आहे. अनेकजण याला पहिलं नाणं म्हणत नाहीत, पण पहिल्या काही नाण्यांपैकी एक नक्की असेल असं मानतात. आता तुम्हाला समजले असेल लोकांसाठी या नाण्याचं एवढं महत्व का आहे!!
८ ऑक्टोबरला या नाण्याचा लिलाव होणार आहे. लास वेगास येथील एक रहिवासी ब्रूस मोरेलीन यांनी हे चांदीचे नाणे १ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्यावेळी एखाद्या लिलावात दिली गेलेली सर्वात जास्त किंमत म्हणून त्याची नोंद झाली होती.
ब्रूस यांना नाणी गोळा करण्याचा छंद आहे. हे नाणे त्यांच्या संग्रहात जमा झाले तेव्हा यापुढे आणखी काही नवं घ्यायची गरज नाही असे त्यांनी म्हटले होते. हे नाणे १५ ऑक्टोबर १७९४ रोजी पाडलेल्या १७५८ चांदीच्या नाण्यांपैकी उरलेल्या ३०० नमुन्यांपैकी एक आहे.
तुम्हांलाही अशी नाणी जमवायचा छंद आहे का? असेल तर ही नाणी कुठून, कशी आणि किती किंमतीला मिळाली? तुमच्याकडचं सर्वात जुनं नाणं कोणत्या सालचं आहे आणि त्यासाठी तुम्हांला किती पैसे मोजावे लागले? नाण्यांचे फोटो तर शेअर करा...