पेश आहे जगातील सर्वात महागडी बाईक : हार्ले-डेव्हीडसनची कस्टम ब्ल्यू एडीशन...

मित्रांनो, या पृथ्वीतलावर धनदांडग्या कुबेरपुत्रांची कमी नाही. वरून त्यांच्या शाही उधळपट्टी आणि मिजासालाही मर्यादा नाही. आपली श्रीमंती मिरवण्याचा ज्यांना विशेष छंद आहे, खास अशाच लोकांसाठी प्रख्यात बाईक निर्माती कंपनी असलेल्या हार्ले-डेव्हीडसनने जगातली सर्वात महागडी बाईक बनवलीये. किंमत आहे फक्त आणि फक्त १२.२ करोड रूपये!!

स्त्रोत

एखाद्या दुचाकी बाईकची एवढी प्रचंड किंमत ऐकून सर्वसामान्य माणसाचे डोळे विस्फारले नाहीत तर नवलच! पण ही बाईक तशी आहेच खास. या बाईकचं वेल्डिंग, पॉलिश, बीटिंग, आकार देणं, यासारख्या सर्व गोष्टी या हाताने केलेल्या आहेत. या बाईकचे अनेक पार्ट हे गोल्ड प्लेटेड आहेत. त्याचबरोबर बाईकला ३५० हिरे आणि मौल्यवान खड्यांनी सुशोभित करण्यात आलंय. ही जगातली पहिली बाईक आहे जीच्या इंजिनमध्येही LED लाईट्स बसवण्यात आल्या आहेत. इंजिनवर पारदर्शक कॅमशाफ्ट कव्हर बसवला गेलाय ज्यामुळे बाईक चालवताना इंजिनमधले पार्ट्स काम करत असलेले आपण पाहू शकतो!

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत

 

 

बाईकची आणखी एक खासीयत म्हणजे या बाईकचा लोभस निळा रंग. अत्यंत आकर्षक असलेला हा निळा पेंट कंपनीने 'स्पेशल कोटिंग मेथड' ने बनवलाय. पण ती पध्दत काय आहे हे मात्र सिक्रेट ठेवलंय. सोबतच बाईकच्या फ्युअल टॅन्क वर घड्याळ आणि ५.४० कॅरेट सोन्यापासून बनवलेली Dizzler रिंग बसवण्यात आलीये. ज्यामुळे बाईकवरून नजरच हटत नाही!

स्त्रोत

स्त्रोत

हार्ले-डेव्हीडसनच्या Softel Slim S या मॉडेलवर आधारीत ही ब्ल्यू एडीशन बाईक बनवली गेलीय. यामध्ये १.८ लीटरचं एअर कूल्ड V-ट्विन इंजिन बसवलंय जे १४८Nm ची शक्ती निर्माण करतं. "अशी बाईक बनवावी जी आजपर्यंत ना कोणी पाहीली असेल, ना बनवली असेल", हे ध्येय घेऊन ८ लोकांच्या टिमने २५०० तास परिश्रम घेत ही रॉयल बाईक बनवलीये.

बघा मंडळी कोणी आहे का असा हौशी! नाहीतर १२ कोटींमध्ये १२०० होंडा अमेझ कार्सही खरेदी करता येतात... नाही का!!

सबस्क्राईब करा

* indicates required