काय, मराठीतून आयपीएल फायनालची कॉमेंटरी ? जाणून घ्या कोण कोण कॉमेंटरी करणार आणि कुठे पाहायला मिळेल !!

राव, स्टारवाल्यांच एक वाक्य आहे, ‘खरी मजा तर आपल्या भाषेत आहे.’ असं ते म्हणत असले तरी आजवर मराठीतून कॉमेंटरी कधी ऐकली नाही. पण यावर्षी इतिहास बदलणार आहे. कारण पहिल्यांदाच आयपीएल सामन्याची अंतिम फेरी चक्क मराठी कॉमेंटरी सहित पाहता येईल. हा दुर्मिळ योग २७ मे रोजी घडून येणार आहे.

मंडळी, संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत हे दिग्गज आपल्या खास शैलीतून मराठीत समालोचन करणार आहेत. याशिवाय अंतिम सामन्याच्या आधी एक कार्यक्रम होणार असून यात धक धक गर्ल माधुरी आणि स्वप्नील जोशी उपस्थित राहणार आहेत. हा अंतिम सामना तुम्ही ‘स्टार प्रवाह’वर पाहू शकता.

मंडळी एक प्रकारे अंतिम सामना मराठीमय होण्याची जय्यत तयारी झालेली दिसत आहे. आयपीएलच्या मराठी चाहत्यांसाठी तर हा एक मोठाच धमका असेल.

काय मग तयार आहात ना ऐकायला.... “....आणि त्याने मारला षटकार”